Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान; उद्या निवडणुकांचा निकाल

काही ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याने ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 20, 2025 | 07:28 AM
Local Body Election : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान; उद्या निवडणुकांचा निकाल

Local Body Election : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान; उद्या निवडणुकांचा निकाल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक नगरपरिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मात्र, न्यायालयीन प्रकरणांमुळे काही ठिकाणी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. या स्थगित झालेल्या १६ जिल्ह्यांतील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान होणार आहे. तसेच याआधी झालेल्या नगर परिषद, नगर पंचायतींसह शनिवारी होणाऱ्या मतदानानंतर रविवारी (दि. २१) एकत्रितपणे मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर केले जाणार आहेत.

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकायांच्या निणयाविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद होती. अपील दाखल करण्यात आलेल्या ठिकाणी निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत येणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारास त्याचे अर्ज मागे घेण्यास तीन दिवसांचा कालावधी मिळाला असता.

हेदेखील वाचा : Sangli Municipal Election 2025 : सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

दरम्यान, काही ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याने ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. यामुळे अपील दाखल असलेल्या ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली होती.

2 डिसेंबरला झाले मतदान

राज्यातील २४० नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होणार आहे.

अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण

राज्यातील तब्बल २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान काही दिवसांपूर्वी पार पडले. गेल्या अनेक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, खऱ्या अर्थाने या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठा रंग भरला आहे. आता सर्वांचे लक्ष येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

हेदेखील वाचा : Sangli Municipal Election 2025: सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

Web Title: Voting is being held today for 24 municipal councils in maharashtra the election results will be announced tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 07:10 AM

Topics:  

  • Local Body Election
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल
1

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल

महिलांचा अपमान थांबणार कधी? नीतीश कुमारांच्या हिजाब ओढण्याने दुखावली डॉक्टर, थेट सोडला बिहार
2

महिलांचा अपमान थांबणार कधी? नीतीश कुमारांच्या हिजाब ओढण्याने दुखावली डॉक्टर, थेट सोडला बिहार

“मारली लाथ काँग्रेसने…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा; उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांनी खास कवितेतून डिवचलं
3

“मारली लाथ काँग्रेसने…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा; उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांनी खास कवितेतून डिवचलं

‘…ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार’; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान
4

‘…ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार’; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.