Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election 2026: विधान परिषदेसाठी काय आहे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सर्वाधिक जागांसाठी भाजपकडून रस्सीखेच ?

MLC Election 2026 : महायुती संदर्भातील निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जवळपास ९९ टक्के मुद्द्यांवर एकमत झाले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अंतिम चर्चा करून उर्वरित एक-दोन मुद्द्यांवर निर्णय घेतील.

  • By anuradha sagar
Updated On: May 23, 2026 | 03:39 PM
MLC Election, MahaYuti, Maharashtra Politics, Eknath Shinde,

MLC Election, MahaYuti, Maharashtra Politics, Eknath Shinde,

Follow Us
Follow Us:
  •  विधान परिषदेच्या १७ जागांच्या या निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची  भेट
 Maharashtra Vidhan Parishad 2026:  राज्यातील विधान परिषद निवडणुका तोंडावर आल्या असून निवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेच्या १७ जागांच्या या निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अंतिम फॉर्म्युला ठरवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका आणि चर्चांदेखील वेगाने सुरू आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीलाच (भाजप) सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा) विद्यमान नगरसेवकांच्या संख्याबळाचा विचार करता भाजपचा या निवडणुकांमध्ये स्पष्ट वरचष्मा आहे. प्राथमिक माहितीनुसार, १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर लढण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मात्र, शिवसेनेने अधिक जागांवर दावा केल्याने महायुतीतील समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.

पेट्रोल डिझेलची भाववाढ सुरूच, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश

शिंदेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘नंदनवन’ येथे भेट घेतली. या बैठकीत जागावाटप, सध्याचे संख्याबळ आणि विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी देण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी महायुती सर्व १७ जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

“९९ टक्के मुद्द्यांवर एकमत”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महायुती संदर्भातील निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जवळपास ९९ टक्के मुद्द्यांवर एकमत झाले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अंतिम चर्चा करून उर्वरित एक-दोन मुद्द्यांवर निर्णय घेतील. सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे, त्या पक्षालाच ती जागा देण्याचा प्राथमिक फॉर्म्युला आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचा विचार केला जाईल. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता.”

महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण जागांपैकी महायुतीमध्ये प्राथमिक स्तरावर खालील सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यात भाजपला १२ जागा, शिवसेना शिंदे गटाला ३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ जागांसाठी चर्चा झाली.

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी

भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचे कारण काय?

या निवडणुका स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमधून होणार आहेत, जिथे प्रामुख्याने महानगरपालिका आणि नगरपालिकांचे सदस्य मतदान करतात. अलीकडेच पार पडलेल्या राज्यातील २९ महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने तब्बल १,४२५ जागा जिंकून एकहाती मोठा विजय मिळवला आहे. याउलट शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे संख्याबळ भाजपच्या तुलनेत बरेच मर्यादित आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे जितके संख्याबळ, त्यानुसार जागावाटपाचा हा नैसर्गिक फॉर्म्युला ठरवण्यात येत आहे.

जागांवरून महायुतीत ‘रस्सीखेच’ आणि पेच

हा जरी प्राथमिक फॉर्म्युला समोर आला असला, तरी काही विशिष्ट जागांवरून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये अद्याप अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे.

पुणे आणि कोकणची जागा: पुणे आणि कोकण या जागांवर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर आता स्थानिक पातळीवरं गणिते फार बदलली आहेत. त्यामुळे आता भाजपनेही पुण्याच्या जागेवर दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे, कोकणच्या जागेसाठी (रायगड-रत्नागिरी-
सिंधुदुर्ग) अजित पवार गटाचे तटकरे आणि शिंदे गटाचे नेते आमनेसामने आले आहेत.

ठाणे आणि नाशिक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. तरीही ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या जागा आपल्याकडेच राहाव्यात यासाठी दोन्ही पक्षांकडून दबाव टाकला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर: शिंदे गट आपली पारंपरिक जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे संकेत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिले आहेत.

 

 

 

Web Title: What is the mahayutis seat sharing formula for the legislative council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahayuti Politics
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
3

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
4

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.