Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झिशान सिद्दीकी यांची आमदारकी धोक्यात? तटकरेंच्या एका सहीमुळे सगळं फिस्कटणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुनील तटकरे यांनी केलेल्या एका सहीमुळे झिशान सिद्दिकींची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 04:59 PM
Zeeshan Siddiqui's membership in Maharashtra Legaslative Assembly in danger, Zeeshan Siddiqui, NCP, Sunil Tatkare,

Zeeshan Siddiqui's membership in Maharashtra Legaslative Assembly in danger, Zeeshan Siddiqui, NCP, Sunil Tatkare,

Follow Us
Close
Follow Us:
  • आमदार झिशान सिद्दीकी यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
  • झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर आणि सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी
  • निवडणूक आयॊगाला पाठवलेल्या नव्या कार्यकारणीत सुनील तटकरे यांच्या नावाचा आणि पदाचा उल्लेख नाही.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्र्वादि काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरु असल्याचे दिसत आहे. पक्षातील एकूण नाराजीनाट्य संपण्याची अजूनतरी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील घडामोडी या झपाट्याने बदलत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षातील पदावरून पक्षात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अश्यातच आता राष्ट्रवादीला आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता असून आमदार झिशान सिद्दीकी यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुनील तटकरे यांनी केलेल्या एका सहीमुळे झिशान सिद्दिकींची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून गोंधळाची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर आणि सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी आहे. परंतु, २९ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयॊगाला पाठवलेल्या पत्रात पक्षाची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारणीत सुनील तटकरे यांच्या नावाचा आणि पदाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पत्र पाठ्वल्याच्या दुसर्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांनी आपला एबी फॉर्म जमा केला. त्यावर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही होती. त्यामुळे मोठी तांत्रिक विसंगती निर्माण झाली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नसणे आणि एबी फॉर्म वर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची सही असणे यामुळे मोठा गोंधळ उडाला असून झिशान सिद्दिकींची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याने या नाराजीनाट्याला सुरुवात झाली. यानंतर पक्षाकडून याबाबत स्पष्टीकरण देत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणी यादीत नसणे हि प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाला नव्या कार्यकारिणी यादीबाबत लवकरच पत्र पाठवले जाईल असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही हि खरंच एक प्रिंटिंग मिस्टेक होती कि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेला अप्रत्यक्ष संदेश होता याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षातील नाराजीनाट्यावरून अद्याप काही प्रतिक्रिया दिली नसली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार पटेल आणि तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. “अजित पवार यांनी शेवटच्या चार महिन्यांत माझ्याशी बोलताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीतील २२ आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला होता.

NEET Paper leak Case: धर्मेंद्र प्रधान यांना त्वरित पदावरून हटवा, NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी यांची मागणी

Web Title: Zeeshan siddiquis membership in maharashtra legaslative assembly in danger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • sunil tatkare
  • Zeeshan Siddique

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट
1

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

NCP Politics:  सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती
2

NCP Politics: सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती

NCP Politics: ‘आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?’; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याने खळबळ
3

NCP Politics: ‘आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?’; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याने खळबळ

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद
4

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.