Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या 'शुद्धीकरण'; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!
बंगळूर विधानसभा पोलिसांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी शुद्धीकरण प्रकरणात झिरो एफआयआर दाखल केला आहे. आरोपींमध्ये उत्तराखंड राज्य भाजपचे एक सदस्य आणि इतरांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे माजी उपाध्यक्ष टी. आर. रामप्पा यांच्या तक्रारीनंतर शुक्रवारी विधानसभा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला.
८ ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांनी हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले होते.पण ११ ऑगस्ट रोजी काही लोकांनी हवन करून मंचाचे शुद्धीकरण करण्यात आले, असा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसने याचा संबंध जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेशी जोडून निषेध केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हल्द्वानी शुद्धीकरण घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. जर मोदी दलित असते आणि त्यांच्यासोबत असेच घडले असते, तर ते गप्प राहिले असते का. असा प्रश्न खर्गेंनी उपस्थित केला.
Chandrapur Crime : राखी बांधून बहिणी निघाल्या अन् भावानेच केला भावाचा घात; मटण करीवरून झाला होता वाद
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ३ सप्टेंबर रोजी पत्र लिहून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी संसदेत आश्वासन देऊनही शुद्धीकरण घटनेत एफआयआर दाखल न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
या पत्रात त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना या प्रकरणात सामील असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही केली. खर्गे म्हणाले की, अशा लोकांना धडा शिकवणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, या प्रकरणातील त्यांचा राग केवळ वैयक्तिक नसून, समाजातील मोठ्या वर्गावर परिणाम करणाऱ्या मानसिकतेविरोधात आहे.
‘शुद्धीकरण’ प्रकरणावरून निर्माण झालेला वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचला आहे. श्री राम सेना चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्टशी संबंधित अमित कुमार यांनीही हल्द्वानीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हल्द्वानीमध्ये ३१ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, राहुल गांधी यांनी एका धार्मिक विधीला जातीय रंग देऊन वाल्मिकी आणि अनुसूचित जाती समुदायांच्या भावना दुखावल्या आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.






