Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दरम्यान मुलांमध्ये हट्टीपणा, चिडचिडे होते. एवढचं नाहीतर, पैशांची चणचण पाहायला मिळते. हातात पैसा असून टिकत नाही म्हणून घर नेहमी वास्तूशास्त्रानुसार असावे, असे म्हटले जाते. शास्त्रामध्ये भिंतीवरच्या फोटोबाबात लिहिले आहे. कोणत्या प्रकाराचे फोटो घरात अशुभ मानले जातात. कोणते आहेत ते फोटो, चला जाणून घेऊया. Vastu Tips for Home:
अनेकांना युद्धाचे फोटो, लढाईचे फोटो घरात लावायला आवडतात. पण वास्तुशास्त्रानुसार हे खूपच चुकीचं आहे. घराच्या कोणत्याच भिंतीवर युद्धाचा प्रसंग असलेला फोटो लावू नका. या फोटोमध्ये हिंसा, राग, भांडण जोडलेले असल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते. दरम्यान घरातले वातावरण तसेच तयार होतं. घरात सतत वादविवाद सुरू राहतो. शांतता भंग होते. जर तुम्ही असा फोटो घरात लावला असेल तर तो आजच काढून टाका. त्याऐवजी सुंदर निसर्गाचे, हसऱ्या कुटुंबाचे फोटो लावा.
वाघ, सिंह, चित्ता अशा हिंस्र प्राण्यांचे फोटो पण घरात लावू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं. अनेक लोक शो म्हणून हॉलमध्ये वाघाचा मोठा फोटो लावतात. मात्र हे अशुभ मानलं जातं. हिंस्र प्राण्यांचे फोटो घरात लावल्याने घरातली पॉझिटिव्ह एनर्जी कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरात वास्तुदोष तयार होतो. तुमच्या कामात अडथळे येतात, मनात भीती राहते. त्यामुळे अशा प्राण्यांचे फोटो घरात लावणे टाळा. तुम्हाला प्राण्यांचे फोटो आवडत असतील तर सुंदर पक्षी, हरीण, हत्ती अशा शांत प्राण्यांचे फोटो लावा.
निवडुंग, कॅक्टस अशा काटेरी झाडांचे फोटो पण घरात लावू नयेत. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की काटेरी झाडांचे फोटो लावल्याने घराला बरकत राहत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. काटेरी झाडं ही रुखक्षतेचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे घरात पण तसाच रुक्षपणा येतो. नात्यांमध्ये दुरावा येतो. म्हणून घरात नेहमी हिरवीगार, फुलं असलेली, सुंदर झाडांचे फोटो लावा. त्याने घरात प्रसन्नता राहते.
घरात नेहमी सकारात्मकता देणारे फोटो लावा. वाहत्या पाण्याचे, उगवत्या सूर्याचे, सुंदर बागेचे, हसणाऱ्या मुलांचे फोटो लावा. देवांचे फोटो लावा. त्याने घरात शांतता राहते, लक्ष्मी टिकते.आपलं घर म्हणजे आपलं मंदिर आहे. तिथे काय लावतो, काय ठेवतो याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. चुकीचे फोटो असतील तर ते काढून टाका आणि चांगले, सकारात्मक फोटो लावा. नक्कीच फरक जाणवेल.
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा
(टीप: ही माहिती वास्तुशास्त्राच्या सामान्य मान्यतांवर आधारित आहे. याचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे नाही, फक्त माहिती देणे आहे.)






