वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप (फोटो- सोशल मिडिया)
आबुदाबी व दुबई येथे केवळ दोनच स्पर्धा बाकी असताना या मौसमाअखेर जाहीर होणाऱ्या मानांकनासाठीच्या शर्यतीत चॅकाराने पॅट्रिक रीड आणि रोरी मॅकएलरॉय या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली आहे. दिल्ली गोल्फ कोर्सवर पार पडलेल्या या स्पर्धेत ४० लाख डॉलर्स पारितोषिकाची रकमेतील अखेरचा दिवस सर्वच खेळाडूंसाठी व्यस्त ठरला.
Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारी, आकांक्षा कदमची उपांत्य फेरीत धडक
चॅकाराने हि तिसऱ्या फेरीतील राहिलेली ७ होल पूर्ण करताना ३ बर्डीज आणि एका इगल सह ५ अंडर अशी कामगिरी बजावली. चॅकाराची चारही फेऱ्यांमधील कामगिरी ६७-६७-६३-७०- अशी होती. यामुळे त्याने टॉमी फ्लिटवूड याची सर्वोत्तम कामगिरी एका फटक्याच्या सरस अंतराने एकूण २१ अंडर अशा गुणांनी मागे टाकली. त्याने एकूण २४ बर्डी आणि १ इगल सह ५ बोगी ही केल्या.
या स्पर्धेला नवा विजेता मिळत असतानाच स्मार्ट लॉजिटिक्स क्षेत्रातील जगातील अग्रगण्य उद्योग संस्था डीपी वर्ल्ड यांनी २०३५ पर्यंत या स्पर्धेला प्रायोजकत्व देण्याचे जाहिर केल्यामुळे भारतीय गोल्फ क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले. त्यामुळे २०३५ पर्यंत ही स्पर्धा डीपी वर्ल्ड चॅम्पियनशिप या नावाने ओळखली जाईल.
दरम्यान स्पर्धेत चॅकारा पाठोपाठ न्यूझीलंडच्या डॅनियल हीलियर याने १९ अंडर अशा गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. त्याने ९व्या होल नंतर दोन फटक्याची आघाडी घेत चॅकाराला धक्का दिला होता. परंतु चॅकाराने अखेरपर्यंत कडवी झुंज देत विजेतेपद पटकावले. चॅकाराने अखेरच्या फेरीत ५ फटक्यांची आघाडी कायम राखताना एकही बोगीची नोंद न करता ६३ गुणांची नोंद केली. हि कामगिरी करताना त्याला पायाच्या अंगठ्याला झालेल्या गंभीर दुखापतीवर मात केली.
Kabaddi Tournament : मुंबई पोलीस संघाचा दणका, व्यावसायिक गटात दणदणीत विजय
चॅकारा म्हणाला की, चार फेऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि गेल्या काही आठवड्यांच्या कडव्या झुंझीनतर मिळवलेले हे विजेतेपद माझ्यासाठी मोलाचे आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या रायडर कप या स्पर्धेसाठी संघात असावे, अशी माझी इच्छा आहे. युरोपियन कर्णधार ल्युक डोनाल्ड यालाही मी तसे सांगितले आहे. परंतु त्या संघात स्थान मिळवणे खरोखरीच आव्हानात्मक आहे. मी त्यासाठी अतिशय कठोर परिश्रम करत आहे.






