ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची रास एखाद्या विशिष्ट ग्रहाच्या प्रभावाखाली असते. त्या ग्रहाशी संबंधित इष्टदेवतेची श्रद्धेने उपासना केल्यास जीवनातील अडथळे कमी होतात, मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते. त्यामुळे राशीनुसार इष्टदेवतेची उपासना करण्याला विशेष महत्त्व आहे.
प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. या ग्रहांच्या शुभ किंवा अशुभ स्थितीवरुन एखाद्या व्यक्तीचा स्वभाव देखील कळतो. अशाच या बारा राशींच्या विविध स्वभावाच्या व्यक्तींचे काही इष्टदेव ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत कोणते आहेत हे इष्टदेव चला जाणून घेऊयात.
मेष राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. ही माणसं अत्यंत धाडसी आणि तापट स्वभावाची असतात. या राशीच्या व्यक्तींनी श्री हनुमानाची उपासना केल्यास धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास वाढतो.
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने ही माणसं समाजात चांगलीच लोकप्रिय असतात. माता लक्ष्मीची उपासना केल्यास यांना आर्थिक स्थैर्य, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धी प्राप्त होते.
मिथुन राशीचा ग्रह बुध असून बुद्धी, वाणी आणि निर्णयक्षमता वाढवण्यासाठी श्री गणेशाची उपासना फलदायी मानली जाते.कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असतो. अशा व्यक्तींनी भगवान शिवाची उपासना केल्यास मानसिक शांती व भावनिक स्थैर्य मिळते.
सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने सूर्यनारायणाची उपासना आत्मविश्वास, आरोग्य आणि नेतृत्वगुण वाढवते. रोज सकाळी सूर्याला अर्ध्य देणं यांच्यासाठी शुभ आहे.
कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असतो. अशा व्यक्तींनी भगवान शिवाची उपासना केल्यास मानसिक शांती व भावनिक स्थैर्य मिळते. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने सूर्यनारायणाची उपासना आत्मविश्वास, आरोग्य आणि नेतृत्वगुण वाढवते.
कन्या राशीचा ग्रह बुध असून श्री विष्णूची उपासना केल्यास शिस्त, संयम आणि कर्मसिद्धी प्राप्त होते. बुध हा बुद्धीचा कारक आहे. त्यामुळे विष्णू भगवानांची उपासना केल्याने यांना शैक्षणिक क्षेत्रात साकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.
तुला राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्याने माता महालक्ष्मीची उपासना केल्यास नातेसंबंधात समतोल आणि भौतिक सुख प्राप्त होते.
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून महाकाल किंवा भैरव स्वरूपातील शिवोपासना संकटांवर मात करण्यास मदत करते.
धनु राशीचा स्वामी गुरु असल्याने भगवान विष्णू किंवा दत्तात्रेयांची उपासना ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगती देते.
मकर आणि कुंभ राशींवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. या राशीच्या व्यक्तींनी भगवान शिव किंवा हनुमानाची उपासना केल्यास कष्टाचे योग्य फळ मिळते.
मीन राशीचा स्वामी गुरु असून श्रीकृष्ण किंवा विष्णूची उपासना भक्ती, करुणा आणि आत्मिक शांती प्रदान करते.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो. त्या ग्रहाशी संबंधित इष्टदेवतेची श्रद्धेने उपासना केल्यास ग्रहदोषांचा प्रभाव कमी होतो, मानसिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता वाढते.
Ans: प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. त्या ग्रहाशी संबंधित देवतेची उपासना केल्यास ग्रहाची शुभ फळे वाढतात आणि अशुभ परिणाम कमी होतात.
Ans: ज्या देवतेची उपासना केल्याने व्यक्तीला मानसिक बळ, मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, त्या देवतेला इष्टदेवता म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या प्रभावानुसार इष्टदेवता ठरते.






