राहु, शनी आणि केतू म्हणजे कुंडलीतील व्हिलन असंच सर्वसाधारण समज आहे. खरंच राहू केतू आणि शनी हे नाकारात्मक किंवा पापी ग्रह आहेत का ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र चला जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्रामध्ये राहु आणि शनी यांना “पापग्रह” असे संबोधले जाते. मात्र “पापग्रह” हा शब्द ऐकून अनेकांना हे ग्रह कायम वाईट परिणामच देतात, असा गैरसमज होतो. प्रत्यक्षात ज्योतिषातील पापग्रह संकल्पना ही नैतिक “पाप–पुण्यां”शी नसून, ग्रहांच्या स्वभावाशी आणि त्यांच्या परिणामांच्या संबंधित असते.
ज्योतिषशास्त्रामध्ये जे ग्रह जीवनात संघर्ष, विलंब, अडथळे, परीक्षा, मानसिक ताण किंवा भौतिक नुकसान घडवून आणतात, त्यांना पापग्रह म्हटले जाते. हे ग्रह माणसाला सहज सुख न देता, प्रयत्न, संयम आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात.
शनी हा कर्माचा कारक मानला जातो. तो व्यक्तीच्या पूर्वजन्मातील कर्मांनुसार फळ देतो. शनीचा प्रभाव असल्यास यश उशिरा मिळते, संघर्ष वाढतो, जबाबदाऱ्या वाढतात. शनी लगेच फळ देत नाही, तर कठोर परिश्रम, शिस्त आणि संयमाची परीक्षा घेतो. म्हणूनच त्याला “क्रूर” किंवा पापग्रह म्हटले जाते. मात्र शनी न्यायप्रिय आहे—योग्य कर्म करणाऱ्यांना तो आयुष्यात स्थैर्य, प्रतिष्ठा आणि दीर्घकाळ टिकणारे यश देतो.
शनी कर्माचा कारक असल्याने तो मेहनत प्रचंड करुन घेतो. या मेहनतीचं फळ उशीरा मिळतं पण जे मिळतं ते अपेक्षेपेक्षा जास्त असतं. शनीच्या कर्मचा फेरा चुकत नाही त्यामुळे अनेकांना असं वाटतं की साडेसाती आपल्याच नशिबी आली आहे. शनी मेहनत आणि संयम शिकवतो. शनी, केतू आणि राहू हे पापग्रह मानले जात असले तरी त्यांच्या प्रभावाने आयुष्यात मोठी शिकवण मिळते.
राहु हा छाया ग्रह असून तो भ्रम, आकस्मिक घटना, मोह, महत्त्वाकांक्षा आणि अस्थिरता दर्शवतो. राहुचा प्रभाव असताना माणूस चुकीच्या निर्णयांकडे वळू शकतो, फसवणूक, गैरसमज किंवा अचानक बदल अनुभवतो. राहु मानसिक अस्वस्थता वाढवतो, म्हणून तो पापग्रह मानला जातो. मात्र योग्य स्थितीत राहु संशोधन, तंत्रज्ञान, परदेशी संधी आणि वेगळ्या विचारसरणीतून यशही देतो.राहु आणि शनी पापग्रह असले तरी ते फक्त त्रास देणारे ग्रह नाहीत. हे ग्रह माणसाला जीवनाचे कठोर धडे शिकवणारे गुरू आहेत. योग्य मार्गाने कर्म, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास हेच पापग्रह आयुष्याला दिशा देणारे ठरतात.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.
Ans: पापग्रह म्हणजे नैतिक अर्थाने वाईट ग्रह नव्हेत. जे ग्रह जीवनात अडथळे, विलंब, मानसिक ताण, संघर्ष किंवा परीक्षा देतात, त्यांना पापग्रह म्हटलं जातं. हे ग्रह माणसाला परिपक्व बनवतात.
Ans: शनी हा कर्माचा कारक आहे. तो पूर्वजन्मातील व वर्तमान कर्मांनुसार फळ देतो. यश देताना विलंब, मेहनत आणि जबाबदाऱ्या वाढवतो. म्हणूनच शनी कठोर वाटतो आणि त्याला पापग्रह म्हटलं जातं.
Ans: साडेसाती म्हणजे शनीचा साडेसात वर्षांचा कालावधी. या काळात व्यक्तीच्या संयमाची, कष्टाची आणि मानसिक बळाची परीक्षा होते. हा काळ कठीण असतो, पण जीवनात मोठा बदल घडवणारा ठरतो.






