Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brahma Purana: ब्रह्मपुराणाचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या आदीपुराणातीलमधील खास वैशिष्ट्ये

हिंदू धर्मात धर्मग्रंथांनुसार चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये अठरा पुराणे ही विविध ग्रंथांविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. महापुराणांपैकी 'ब्रह्मपुराण' हे पहिले पुराण मानले जाते. या पुराणात काय सांगितले आहे, जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 20, 2026 | 01:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अठरा महापुराणांपैकी ब्रह्मपुराण हे पहिले पुराण
  • ब्रह्मपुराणाला आदिपुराण म्हणून देखील संबोधतात
  • पुराणाची सुरुवात कशी झाली
 

 

हिंदू धर्मातील अठरा महापुराणांमध्ये ब्रह्मपुराण याला विशेष स्थान आहे. ब्रह्मपुराण हे पुराणांच्या यादीतील पहिले मानले जात असल्यामुळे त्याला आदिपुराण असेही संबोधले जाते. सृष्टीची निर्मिती, राजवंशांचा इतिहास, तीर्थमहात्म्य, देवकथा, धर्मतत्त्व आणि मोक्षमार्ग यांचे विस्तृत वर्णन करणारा हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि पुराणपरंपरेचे दर्शन घडवणारे ब्रह्मपुराण आजही अभ्यासक आणि भक्तांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.

हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी ब्रह्मपुराण हे पहिले पुराण मानले जाते. म्हणूनच याला आदिपुराण असेही म्हटले जाते. परंपरेनुसार ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतींना यातील ज्ञान सांगितले, म्हणून याला ब्रह्मपुराण हे नाव प्राप्त झाले. विद्वानांच्या मते या पुराणाचा मूळ भाग इ.स.च्या सातव्या–आठव्या शतकांपूर्वी तयार झाला असावा आणि पुढे दहावे, बारावे आणि पंधरावे शतक यांमध्ये त्यात काही भागांची भर पडली असावी. यातील काही भाग ओडिशा आणि काही दंडकारण्य प्रदेशात रचला गेला असावा असे मानले जाते.

संत चोखामेळांचे जीवनचरित्र; जाणून घ्या अखंड विठ्ठलभक्तीची प्रेरणादायी कथा

हिंदू परंपरेनुसार एकूण १८ महापुराणे मानली जातात. त्यामध्ये ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड पुराण यांचा समावेश होतो. यापैकी ब्रह्मपुराणाला यादीत प्रथम स्थान असल्यामुळे त्याला पहिले पुराण म्हणतात. याचा समावेश राजस पुराणांमध्ये केला जातो. या पुराणात २४५ अध्याय आणि सुमारे १४ हजार श्लोक आहेत.

पुराणाची सुरुवात

नैमिषारण्यात तप करणाऱ्या ऋषी आणि महर्षी लोमहर्षण सूत यांच्या संवादाने होते. सुरुवातीला सृष्टीची निर्मिती, विश्वाची उत्पत्ती आणि पृथ्वीची रचना यांचे वर्णन येते. राजा वेन यांचा पुत्र पृथुवैन्य याने पृथ्वी प्रथम नांगरली अशी कथा येथे सांगितली आहे. यानंतर मनुवंश, सूर्यवंश, सोमवंश, आयुवंश, पुरुवंश, वृष्णिवंश अशा अनेक राजवंशांचे वर्णन येते. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणल्याची कथा, राजा सगर, ययाती, दशरथ, प्रभू राम आणि कुश यांच्या कथा येथे विस्ताराने सांगितल्या आहेत. रघुवंशाचे वर्णन पुढे प्रसिद्ध कवी कालिदास यांच्या काव्यावरही प्रभाव टाकणारे मानले जाते.

Shukra Gochar: अधिक महिन्यात शुक्र राहूच्या आर्द्रा नक्षत्रात करणार संक्रमण, धनु राशीसह या राशींनी बाळगावी सावधगिरी

या पुराणात जम्बूद्वीप, भारतवर्ष, तीर्थक्षेत्रे, ग्रहस्थिती, पाताळ आणि नरक यांचे वर्णन आहे. भारतभूमीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिराचे महत्त्व आणि सूर्योपासनेचे विशेष वर्णनही येथे मिळते.

शिव-पार्वती विवाह, दक्षयज्ञ विध्वंस, कामदेव दहन, नरसिंह महात्म्य, वामनकथा, गंगेचे विविध रूप, गौतम ऋषींच्या कथा, अनेक तीर्थांचे महात्म्य आणि भगवान कृष्णाचे चरित्रही या पुराणात आले आहे. शेवटी सदाचार, वर्णाश्रमधर्म, श्राद्ध, कलियुग, योग, सांख्य आणि परमात्मतत्त्व यांचे विवेचन करून ब्रह्मपुराणाचा उपसंहार केला आहे.

अशा प्रकारे ब्रह्मपुराण हे केवळ धार्मिक कथांचे संकलन नसून भारतीय संस्कृती, तीर्थपरंपरा, धर्मतत्त्व आणि जीवनमूल्यांचा विस्तृत ग्रंथ मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रह्मपुराण म्हणजे काय?

    Ans: ब्रह्मपुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी पहिले महापुराण मानले जाते. याला “आदिपुराण” असेही म्हटले जाते.

  • Que: ब्रह्मपुराणाला “आदिपुराण” का म्हटले जाते?

    Ans: अठरा महापुराणांच्या यादीत ब्रह्मपुराणाला पहिले स्थान असल्यामुळे त्याला आदिपुराण असे संबोधले जाते.

  • Que: ब्रह्मपुराणाची सुरुवात कशी होते?

    Ans: या पुराणाची सुरुवात नैमिषारण्यात ऋषी आणि लोमहर्षण सूत यांच्या संवादाने होते.

Web Title: Brahma purana history and religious significance of the ancient scripture know the unique features of the adi purana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य
1

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य

Panchak 2026: पंचकाच्या काळात सोने-चांदी खरेदी करावी की नाही? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या
2

Panchak 2026: पंचकाच्या काळात सोने-चांदी खरेदी करावी की नाही? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा
3

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी
4

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.