बुध ग्रह मार्गी झाल्याचा कोणत्या राशींवर होणार परिणाम
16 डिसेंबर रोजी वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक बुध वृश्चिक राशीत मार्गी झाला आहे. बुधाच्या थेट हालचालीचा देश आणि जगावर परिणाम होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या थेट हालचालीचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो, तर काही राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. बुध हा खरं तर बुद्धीचा ग्रह मानला जातो. मात्र त्याचा काही राशींवर नकारात्मक परिणाम लवकर होतो. विशेषतः बुध जेव्हा मार्गी होतो तेव्हा त्याचा काही ठराविक राशींवर नकारात्मक परिणाम अधिक होताना दिसून येतो.
अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या थेट हालचालीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना महिनाभर काळजी घ्यावी लागेल हे आपल्याला ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी अभ्यासपूर्वक सांगितले आहे. कोणत्या आहेत या राशी ज्यांनी महिनाभर सावध राहण्याची गरज आहे जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
कन्या रास
बुधाची थेट हालचाल अर्थात बुध मार्गी होणे हे कन्या राशीसाठी अनुकूल नाही. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. व्यवसायाची आर्थिक गती मंदावू शकते. या काळात आर्थिक स्थिती फारशी चांगली राहणार नाही. कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. मुलांकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे महिनाभर तरी या राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा
2025 मध्ये सूर्यग्रहण आणि शनि गोचर दुर्लभ योग, ३ राशींचे नशीब उघडणार; पैशांची सरबत्ती होणार
धनु रास
या राशीच्या 12व्या घरात बुध ग्रहाचे थेट आगमन झाले आहे. अशा परिस्थितीत, या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित सर्व कामांमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच या काळात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आर्थिक संकटाचीही चिन्हे आहेत. तुमच्या इच्छेनुसार पैसे मिळवण्यात तुम्हाला यश मिळणार नाही. आर्थिक नुकसान होऊ शकते, स्वतःला आणि नोकरीला सांभाळून राहा, रागावर नियंत्रण ठेवा आणि पैशाची काळजी घ्या
मीन रास
या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह मार्गी असणे फारसे चांगले नाही. कारण या राशीच्या 9व्या घरात बुध ग्रहाने प्रवेश केला आहे. बुधाच्या मार्गी काळात सुख-सुविधांमध्ये घट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. यशात अडथळे येऊ शकतात. प्रतिष्ठा मिळविण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Nostradamus Prediction 2025: नव्या वर्षासाठी नास्त्रेदमसची भविष्यवाणी, 6 राशींचा केला उल्लेख
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.