फोटो सौजन्य: X.com
निसानकडून भारतात पहिल्यांदाच एमपीव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश केला जात आहे. Nissan Gravite ही कंपनीची भारतातील पहिली एमपीव्ही ठरणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये कंपनीने या एमपीव्हीच्या डिझाइनची झलक दाखवली होती. मात्र फीचर्स आणि इंजिनसंदर्भातील संपूर्ण माहिती तेव्हा देण्यात आली नव्हती. ही एमपीव्ही CMF-A+ प्लॅटफॉर्मवर आधारित असणार असून चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या सेगमेंटमध्ये ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल
ग्रेवाइटमध्ये नवीन एलईडी डीआरएल्स, आकर्षक फ्रंट ग्रिल, वेगळ्या डिझाइनचे बंपर्स, नवीन अलॉय व्हील्स आणि ताजे कलर ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. एकूणच तिचा लूक आधुनिक आणि प्रीमियम ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.
या एमपीव्हीत 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, रेन सेन्सिंग वायपर्स, वायरलेस चार्जिंग पॅड आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स यांसारखी आधुनिक सुविधा दिल्या जाऊ शकतात.
या एमपीव्हीमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हेच इंजिन Renault Triber मध्येही वापरले जाते. या इंजिनमधून सुमारे 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क मिळण्याची शक्यता आहे. ट्रान्समिशनसाठी पाच-स्पीड मॅन्युअल आणि पाच-स्पीड एएमटी पर्याय उपलब्ध असू शकतात.
निसानकडून जेव्हा ही एमपीव्ही अधिकृतपणे लॉन्च केली जाईल त्यावेळीच तिची अधिकृत किंमत जाहीर केली जाईल. मात्र अंदाजे 6 लाख रुपयांच्या आसपास (एक्स-शोरूम) किंमत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड
बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये ग्रेवाइटचे थेट स्पर्धक Maruti Ertiga आणि Renault Triber यांसारखी मॉडेल्स असतील. किफायतशीर किंमत आणि चांगली फीचर्स ऑफर केल्यास निसानला या सेगमेंटमध्ये चांगला प्रतिसाद मिळू शकतो.






