इंग्लंडचे इटलीसमोर 203 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
ENG vs ITA, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज २९ व्या सामन्यात इंग्लंड आणि इटली हे संघ आमनेसामने आले आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत विल जॅक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून २०२ धावा केल्या आहेत. इटलीला विजय मिळवण्यासाठी २०३ धावा कराव्या लागणार आहेत. इटलीकडून क्रिशन कलुगामेजने २ विकेट्स घेतल्या आहेत.
कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर( आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ )इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडला तिसऱ्याच षटकात २१ धावांवर पहिला झटका बसला. जोस बटलर ३ धावा करून माघारी गेला. त्यानंतर सलामीवीर फील साल्ट आणि जेकब बेथेल यांनी ३३ धावांची भागीदारी रचली, त्यानंतर फील साल्ट १५ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर जेकब बेथेल, टॉम बॅंटन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जेकब बेथेल २३ धवा करून बाद झाला तर टॉम बॅंटन ३० धावांवर माघारी गेला. कर्णधार हॅरी ब्रुक काही खास करू शकला नाही. तो १४ धावा करून बाद झाला. सॅम करनही २५ धावा करून माघारी गेला.त्यानंतर मात्र संघ चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत असताना मैदानात आलेल्या विल जॅक्सने मात्र इटलीच्या गोलंदाजीवर चांगलेच आक्रमण चढवत इंग्लंडचा डाव पुढे नेला. जेमी ओव्हरटन १५ धावांवर बाद झाला, विल जॅक्सने आपले अर्धशतक पूर्ण करून संघाला देखील २०२ पर्यंत पोहचवले. तो २२ चेंडूत ५३ धावा काढून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. तसेच जोफ्रा आर्चर १ धाव काढून नाबाद राहिला. इटलीकडून ग्रँट स्टीवर्ट आणि क्रिशन कलुगामेज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर जेजे स्मट्स, अली हसन आणि बेन मॅनेंटी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : फिलिप साल्ट, जोस बटलर (w), जेकब बेथेल, टॉम बॅंटन, हॅरी ब्रुक (c), सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद
इटली प्लेइंग इलेव्हन : जस्टिन मोस्का, अँथनी मोस्का, जेजे स्मट्स, हॅरी मॅनेंटी (c), बेन मॅनेंटी, मार्कस कॅम्पोपियानो, ग्रँट स्टीवर्ट, जियान मीड (w), जसप्रीत सिंग, क्रिशन कलुगामेज, अली हसन






