फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला हरियाली तीजचे व्रत पाळले जाते. हे व्रत सुहासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळतात. तसेच या दिवशी निर्जळी उपवास देखील करतात. विधिवत भगवान शिवाची पूजा देखील केली जाते. यंदा हरियाली तीजचे व्रत शनिवार, 26 जुलै रोजी पाळले जाणार आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप खास आहे. कारण या दिवशी चंद्र आणि मंगळाची युती होणार आहे.
शनिवार, 26 जुलै रोजी दुपारी 3.51 वाजता चंद्र सिंह राशीत संक्रमण करणार आहे. या राशीचा ग्रहांचा सेनापती मंगळ आधीच उपस्थित असल्याने सिंह राशीत मंगळ-चंद्राची युती होईल, ज्यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. हा योग 54 तास चालणार असल्याने त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. हरियाली तीज आणि महालक्ष्मी राजयोगाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना या योगाचा फायदा होईल, जाणून घ्या
महालक्ष्मी योगामुळे मिथुन राशीच्या लोकांचा हा काळ खूप शुभ राहणार आहे. घरामध्ये ज्या गोष्टींवरुन तणाव असेल तो दूर होईल. तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये या लोकांना विशेष फायदे होतील. चंद्राला मनाचा कारक मानले जात असल्याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. नवीन नोकरीच्या शोधात असल्यास त्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात असलेल्या लोकांना लाभ होऊ शकतो.
महालक्ष्मी योगाचा सिंह राशीच्या लोकांच्या नातेसंबंधावर चांगले परिणाम होऊ शकतात. नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असल्यास त्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कठोर मेहनत घेणाऱ्याची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होईल. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.
मीन राशीच्या लोकांना महालक्ष्मी योग अधिक फायदेशीर राहणार आहे. हे लोक व्यवसायामध्ये तुम्ही चांगले नाव कमवाल. परदेशात काम करू इच्छिणाऱ्यांना काही नवीन अपडेट्स मिळू शकतात. जर तुम्ही व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्या कारकिर्दीतही वाढ दिसून येईल. तुम्ही ज्या नवीन योजना आखत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)