Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक आहे का? ओटी कधी भरावी, पूजा कशी करावी?

Shardiya Navratri 2026: शारदीय नवरात्राला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. नवरात्रात कुलदेवीचे दर्शन घेणे आणि तिची ओटी भरणे अनेक कुटुंबांमध्ये महत्त्वाचे मानले जाते. मात्र, अंतर, तब्येत किंवा इतर अडचणींमुळे मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरीच देवीची पूजा आणि ओटी भरता येते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 12, 2026 | 03:02 PM
Shardiya Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Shardiya Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शारदीय नवरात्राला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात
  • मंदिरात जाणे शक्य नसल्यास कुलदेवीची पूजा घरी
  • साडी किंवा खण, नारळ, हळद-कुंकू, अक्षता आणि फुले वापरता
Shardiya Navratri 2026: आता नवरात्र सुरु झाली आहे. 11 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झाली असून सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे. या नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा करतात. या दिवसात अनेक कुटुंबात कुलदेवीचे दर्शन घेणे, तिची ओटी भरणे याला खूप महत्व दिले जाते.पण अनेकदा काय होते, लांब अंतर असते, तब्येत बरी नसते किंवा काही अडचण असते त्यामुळे कुलदेवतेच्या मंदिरात जाणे शक्य होत नाही. मग अशा वेळी घरीच पूजा केली तर चालते का? Shardiya Navratri 2026:

घरी ओटी भरता येते का?

कुलदेवतेचे दर्शन घेणे गरजेचे आहे का?आपल्याकडे परंपरा आहे की पिढ्यानपिढ्या आपण एका देवीला कुलदेवी मानतो. नवरात्रात तिच्या मंदिरात जाऊन हळद-कुंकू वाहणे, ओटी भरणे, नैवेद्य दाखवणे हे सगळे केले जाते. याने घरावर देवीची कृपा राहते असे मानले जाते.पण याचा असा कोणताही नियम नाही की नवरात्रात मंदिरात गेलेच पाहिजे.

जर तुम्हाला काही कारणाने जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच देवीची आठवण काढून पूजा करू शकता. देवी फक्त मंदिरातच नाही तर तुमच्या मनात आणि घरात पण आहे. त्यामुळे घरातल्या मोठ्या माणसांना किंवा गुरुजींना विचारून तुम्ही घरच्या घरीच पूजा करू शकता.

घरी देवीची ओटी कशी भरायची?

महाराष्ट्रात देवीची ओटी भरण्याची खूप जुनी परंपरा आहे. मंदिरात जाताना लोक साडी किंवा खण, नारळ, हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पान, फुले असे सगळे घेऊन जातात.जर तुम्हाला मंदिरात जाता आले नाही तर टेन्शन घेऊ नका. घरीच तुम्ही ओटी भरू शकता. त्यासाठी आधी देवघर स्वच्छ करा.

देवीच्या फोटोसमोर दिवा लावा. देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहा. मग एका ताटात साडी किंवा खण, नारळ आणि जे काही पूजेचे सामान आहे ते ठेवा आणि देवीसमोर ठेवा. मनापासून नमस्कार करा आणि प्रार्थना करा. शेवटी आरती करा आणि नैवेद्य दाखवा. प्रत्येक घराची ओटी भरण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे तुमच्या घरात जशी पद्धत आहे तशीच पूजा करा.

नवरात्रात घरात पूजा कशी करावी?

नवरात्राच्या नऊ दिवसात रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करा आणि देवघरात दिवा लावा. कुलदेवीचे नाव घेऊन तिला फुले वाहा.तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर त्याचा जप करा. माहिती नसेल तर सगळ्यात सोपा मंत्र ‘ॐ दुं दुर्गायै नमः’ या मंत्राचा जप केला तरी चालतो.

Durge Durghat Bhari Aarti Meaning: ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती कोणी लिहिली? त्यामागच अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…

रोज देवीची आरती म्हणा, एखादे स्तोत्र वाचा आणि सात्विक नैवेद्य दाखवा.काही घरात घट बसवतात, अखंड दिवा लावतात. हे सगळे तुमच्या घराच्या परंपरेनुसार आणि तुमच्या वेळेनुसार करा. उगाच दुसऱ्याचे बघून जास्त काही करण्याची गरज नाही. श्रद्धेने केलेली छोटी पूजा पण देवीला पोहोचते.

ओटी कोणत्या दिवशी भरावी?

अनेकांना वाटते की ओटी भरण्यासाठी एखादा खास दिवस असतो. पण तसे नाही. काही घरात पंचमीला भरतात, काही अष्टमीला भरतात, तर काही नवमीला. तुमच्या घरात ज्या दिवशी भरायची पद्धत असेल त्या दिवशी भरा. जर काहीच माहिती नसेल तर नवरात्रातल्या कोणत्याही एका दिवशी सोयीनुसार ओटी भरली तरी चालते.

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…

मंदिरात नाही गेलो तर देवी कोपेल का?

अनेक लोक घाबरतात की मंदिरात नाही गेलो तर देवी रागावेल किंवा काही वाईट होईल. पण असे काहीच नसते. देवीला आपण माता म्हणतो. मग आई कधी आपल्या लेकरांवर रागवते का? तुम्ही घरात घटस्थापना करु शकता, किंवा तिचे श्रद्धेने नाव जरी घेतले तरी ती खुश होते. उगाच मनात भीती आणू नका. नवरात्रीमध्ये देवी खाली पृथ्वीतलावर येऊन वाईट गोष्टीचा नाश करुन आपल्या सोबत घेऊन जाते. देवीने महिषासुराला मारून सगळ्यांना वाचवले. त्यामुळे या दिवसात फक्त पूजा नाही तर आपल्या मनातली भीती, राग, वाईट विचार पण दूर करायचे असतात. घरात सगळ्यांनी एकत्र येऊन पूजा, आरती केल्याने घरात एकोपा राहतो आणि आपली संस्कृती पण जपली जाते.

Web Title: Shardiya navratri 2026 kuldevi puja oti at home rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • hindu religion
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

Durge Durghat Bhari Aarti Meaning: ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती कोणी लिहिली? त्यामागच अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…
1

Durge Durghat Bhari Aarti Meaning: ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती कोणी लिहिली? त्यामागच अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!
2

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
3

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…
4

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.