Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Garba History: गरबा हे गुजरातमधील पारंपरिक लोकनृत्य असून नवरात्रीच्या काळात देवी अंबेच्या भक्तीसाठी ते खेळले जाते. पूर्वी मातीच्या छिद्र असलेल्या मडक्यात दिवा ठेवून त्याभोवती गोलाकार फिरत महिला देवीची गाणी म्हणत असत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 11, 2026 | 04:15 PM
Garba History (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Garba History (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

नवरात्र सुरू झाली की सगळीकडे गरब्याचा आवाज यायला लागतो. ढोल, टाळ्या, रंगीबेरंगी कपडे आणि गरब्याची मस्ती. गुजरातचे हे लोकनृत्य आता आपल्या महाराष्ट्रात पण तेवढेच फेमस झाले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबईत तर मोठ-मोठे गरब्याचे कार्यक्रम होतात. पण गरबा म्हणजे फक्त नाचणे नाही, यामागे एक मोठी परंपरा आणि भक्तीची भावना आहे. चला त्याचा इतिहास काय आहे ते सोप्या भाषेत बघू.

गरबा सुरु कसा झाला?

गरबा खूप जुना आहे, शेकडो वर्षांपासून चालत आलेला आहे. आधीच्या काळी नवरात्रीत बायका एका मातीच्या मडक्याला छिद्र पाडायच्या आणि त्यात दिवा लावायच्या. त्या मडक्याला मध्यभागी ठेवून त्याच्या भोवती गोल गोल फिरत नाचायच्या आणि देवीची गाणी म्हणायच्या. हाच खरा गरबा होता. देवीची आराधना करण्यासाठी हा नाच केला जायचा.हळू हळू त्याला म्युझिक लागले, नवीन स्टेप्स आल्या आणि आज तो एवढा मोठा उत्सव बनला आहे. Garba History:

गरबा नावाचा अर्थ काय?

गरबा शब्द म्हणजेे गर्भ असा होतो. मधोमध ठेवलेले मडके म्हणजे सृष्टीचा गर्भ मानले जाते. म्हणजे जिथून जीवन सुरु होते ते. आणि त्या मडक्यात जो दिवा जळतो तो म्हणजे देवीची शक्ती, ऊर्जा.गुजराती भाषेत त्या मडक्याला ‘गरबो’ म्हणतात. त्या गरबो वरूनच गरबा हे नाव पडले. एका छोट्या मडक्यात दिवा तेवतो आणि त्याभोवती सगळे फिरतात, यातूनच जीवनाचे चक्र दाखवले जाते.

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

गोल गोल का फिरतात?

गरब्याचे सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे सगळे गोलाकार फिरतात. सरळ रेषेत गरबा कधीच खेळत नाहीत. गोल आकार म्हणजे जीवन कधीच संपत नाही, ते चालूच राहते याचे प्रतीक आहे. देवी सगळ्यांच्या मध्ये आहे आणि आपण तिच्या भोवती आहोत ही भावना असते.सुरुवातीला गरबा हळू असतो, मग गाण्याचा स्पीड वाढतो आणि टाळ्यांचा आवाज पण वाढतो. यात दोन टाळी, तीन टाळी, हिंच असे बरेच प्रकार असतात. प्रत्येकाची स्टेप वेगळी असते.

सांस्कृतिक महत्व काय?

गरबा हा फक्त टाइमपास नाही, तो देवी अंबेची भक्ती आहे. नवरात्रीत गरबा खेळून देवीला खुश केले जाते. यात सगळे एकत्र येतात. लहान, मोठे, बायका, पुरुष. एकाच तालावर नाचल्याने एकीची भावना तयार होते.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कपडे.

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

गरब्याला चनिया चोळी

शिवाय मजा नाही. मुली रंगीबेरंगी चनिया चोळी घालतात, त्यावर आरशाचे काम असते, भरतकाम असते. आणि मुले कुर्ता-पायजमा आणि डोक्यावर टोपी घालतात. या कपड्यांमुळेच गरब्याला अजून रंगत येते.म्हणून पुढच्या वेळी गरबा खेळायला जाल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त नाचत नाही आहात तर एका जुन्या परंपरेचा भाग बनत आहात, देवीची आराधना करत आहात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Garba history why garba is played in a circle rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
1

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…
2

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?
3

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Navratri 2026 First Day: नवरात्रीची पहिली माळ चुकवू नका! देवी शैलपुत्रीची पूजा, आवडता नैवेद्य आणि शुभ रंग जाणून घ्या
4

Navratri 2026 First Day: नवरात्रीची पहिली माळ चुकवू नका! देवी शैलपुत्रीची पूजा, आवडता नैवेद्य आणि शुभ रंग जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.