फोटो सौजन्य- istock
साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दसरा. दसरा अर्थात विजयादशमी म्हणजे विजयाचा उत्सव. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात झेंडूच्या फुलांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादिवशी विशेषतः झेंडूच्या फुलांचा वापर पूजेसाठी केला जातो. देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचाच वापर होतो. झेंडूच्या फुलांना दसऱ्याच्या दिवशी इतकं महत्त्व का? जाणून घेऊया.
झेंडूच्या फुलांचे महत्त्व
दसरा सणाला झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. खरं तर यामागील कारण म्हणजे झेंडूची फुलं सोप्यारीत्या उपलब्ध असतात. आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे हे फुलं खास आहेत. या रंगामुळे ते सोनेरी असल्याचे जाणवतं आणि तसेही पिवळा, केशरी किंवा सोनेरी रंग शुभ मानले जातात. झेंडूच्या फुलांचा रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे झेंडूच्या फुलांचं धार्मिक महत्त्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे. म्हणून विजयाच्या सणावर झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फुलं वापरण्याचं महत्त्व आहे. या फुलाला हिरण्यगर्भ पुष्प देखील म्हणतात.
हेदेखील वाचा- पूजेमध्ये आंब्याचे, विड्याचे पान; दसऱ्याला आपट्याच्या पानाला का मान?
विजयोत्सवाच्या या दिवशी झेंडूचे फूल अर्पण करण्याचेही महत्त्व आहे. झेंडू हे सूर्याचे प्रतीकही मानले जाते. शास्त्रामध्ये उल्लेख आहे की, झेंडूचे फूल सौंदर्याचेही केंद्र आहे, ज्योतिषींच्या मते, हे फूल जेथे लावले जाते, तेथे नकारात्मक ऊर्जाही दूर होते.”
भगवान विष्णूंना झेंडूचे आवडते फूल
असे म्हटले जाते की, “विधीनुसार पूजा केल्यानंतर झेंडूचे फूल भगवान विष्णूला अर्पण केल्यास देव सर्व समस्या आणि संकटे दूर करतात. झेंडू हे भगवान विष्णूंचे आवडते फूल आहे, म्हणून ते त्यांच्यामध्ये देखील वापरले जाते. भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव होतो.”
हेदेखील वाचा- Dussehra 2024: रावण दहनासह अपराजिता पूजा आणि शमी शस्त्रपूजनाचा शुभ मुहूर्त
झेंडूच्या फुलांचा आरोग्यासाठी फायदा
जर त्वचेवर एखादी जखम झाल्यास किंवा त्वचारोग झाल्यास या फुलांचा रस लावला असता जखम लवकर सुधारते. तसेच तोंडाचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते. मूत्रविकारातदेखील झेंडूच्या औषधी गुणधर्मांचा फायदा होतो. दमा, श्वसनाच्या आजारांवर देखील झेंडू उपयुक्त आहे. सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक झेंडू इंग्रजीमध्ये या फुलाला मेरीगोल्ड म्हटलं जातं हे फुलं सूर्याचे प्रतीक असतात. प्राचीन ग्रंथात असलेल्या नोंदीनुसार हे फुल सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. याला संस्कृतमध्ये स्थूल पुष्प या नावाने ओळखतात. सत्याचे प्रतीक मानलं जातं तसेच पिवळा रंग देवाप्रती समर्पणाचे प्रतीक आहे. याच्या सुंगधाने नकारात्मक शक्ती दूर होऊन ताण कमी होण्यास मदत होते. हे वातावरणाला शांती प्रदान करणारे फुल आहे, असं गुरुजीं नचिकेत कोजरेकर यांनी सांगितले आहे.