Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba Temple : दख्खनचा राजा कोल्हापूरात अवतरला कसा? ज्योतिबाच्या जन्मामागची थरारक पौराणिक कथा!

असं काय घडलं की ज्योतिबा दख्खन राजा म्हणून ओळखू लागला, काय आहे यामागची रंजक कथा, चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 03:21 PM
Jyotiba Temple : दख्खनचा राजा कोल्हापूरात अवतरला कसा? ज्योतिबाच्या जन्मामागची थरारक पौराणिक कथा!
Follow Us
Follow Us:
  • दख्खनचा राजा कोल्हापूरात अवतरला कसा?
  • ज्योतिबाच्या जन्मामागची थरारक पौराणिक कथा!
ज्योतिबाच्या नावानं चांगलभलं ! असं म्हणतं कित्येक घराणी ज्या पायाशी डोकं टेकवतात असा हा दख्खनचा राजा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं की आवठतं ते जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचा विठ्ठल, तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची अंबाबाई आणि याचबरोबर येतो तो ज्योतिबा. पण असं काय घडलं की ज्योतिबा दख्खन राजा म्हणून ओळखू लागला, काय आहे यामागची रंजक कथा, चला तर मग जाणून घेऊयात.

ज्योतिबाच्या देवस्थानाची एक दंतकथा सांगितली जाते, या आख्यायिकेनुसार असं झालं होतं की, गावात रत्नासूर असूराने खूप उपद्रव घातला होता. रत्नासुर आणि कोल्हासुर या राक्षसांनी निरपराध लोकांना विनाकारण त्रास देत होती. देवांवरचा लोकांचा विश्वास उडेल आणि असूरांची सत्ता निर्माण करता येईल या उद्देशाने या असूरांना आपल्या शक्तीचा वाईट अर्थाने वापर केला. त्य़ामुळे नी देव, ऋषी आणि सामान्य जनतेमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. असूरांच्या अत्याचारांमुळे सर्व देवता चिंतेत पडल्या. काय करावं कोणाला काहीच कळत नव्हतं. त्यावेळी करवीर निवासिनी आई अंबाबाईने या असूरांचा वध करण्यासाठी आपल्या मदतीला केदारनाथची उपासना केली. आई अंबाबाईच्या मदतीसाठी तेव्हा केदारनाथ धावून आले. असूरांचा वध करण्याची मोहिम केदारनाथांनी स्विकारली. कोल्हासूर असूराचा वध आई अंबाबाईने केला तर रत्नासूर या असूराचा वध साक्षात केदारनाथांनी केला. केदारनथांनी रत्नासूराचा वध करण्यासाठी जे रुप धारण केलं तो म्हणजे ज्योतिबा.

Khandoba: रविवारी खंडोबाची आराधना का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मोहिम पूर्ण झाल्यावर देव पुन्हा हिमायलाकडे निघत होते. त्यावेळी देवी अंबाबाईने केदारनथांना थांबण्यासाठी अनवाणी धावत गेल्या. त्यावेळी केदारनाथ कोल्हापूरच्या एका डोंगरापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी अंबाबाईने केदारनाथांना विनंती केली की तुम्ही करवीरनगरीच्या रक्षणासाठी इथेच थांबा. केदारनाथांनी ती विनंती मान्य केली. त्य़ादिवसापासून वाडी रत्नागिरी हे दख्खनच्या राजाचं स्थान बनलं. रत्नासूराचा वध केला त्या राजाचा डोंगर म्हणजे वाडी रत्नागिरी. असं देखील म्हटलं जातं की, असूरांचा वध करण्यासाठी महादेव, ब्रह्मा आणि विष्णू या त्रिदेवांनी एकत्र येऊन एक शक्तिशाली रूप धारण केलं. या दिव्य शक्तीमधून ‘ज्योतिबा’ या देवतेचा अवतार झाला.क्षसांचा वध केल्यानंतर ज्योतिबा वाडी-रत्नागिरीच्या डोंगरावर स्थायिक झाले. आजही तेथे त्यांचे भव्य मंदिर असून चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात यात्रा भरते. या यात्रेत लाखो भाविक सहभागी होऊन ज्योतिबाची मनोभावे पूजा करतात.

Tuljapur Devi: काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीचा महिमा, तुळजापूरच्या देवीची अद्भुत कथा जाणून घ्या

Web Title: Jyotiba temple how did the king of the deccan incarnate in kolhapur the thrilling mythological story behind the birth of jyotiba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • hindu religion
  • jyotiba temple
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
2

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
3

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना
4

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.