फोटो सौजन्य - Social Media
महाभारत हे स्वतः भगवान श्रीविष्णूंच्या उपस्थित घडलेले युद्ध आहे. द्वापरयुगाच्या कालखंडात घडलेले हे महाविनाशी युद्ध ज्याप्रकारे लढण्यात आले, ते अतिशय दहणीय आहे. पुराणांमध्ये कलियुगाचा सगळ्यात महाभयंकर म्हंटले गेले आहे पण महाभारताचे हे युद्ध वाचताना आपल्याला लक्षात येईल की द्वापरयुगाच्या उत्तरार्धातच इतका अधर्म असेल तर कलियुगात किती असेल?
महाभारताच्या लढाईत जेव्हा पांडव आणि कौरव आमनेसामने होते तेव्हा दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात अधर्म करण्यात आला. अधर्माशिवाय पांडव जिंकूही शकत नव्हते पण सुरुवातही निश्चितच कौरवांकडून झाले. पांडवांना त्यांच्या हक्काचे राज्य दिले असते तर कदाचित महाभारत घडलेच नसते पण महाभारत घडलं! कौरवांच्या त्या अधर्मामुळे ज्यात त्यांनी पांडूच्या पुत्रांना त्यांच्या हक्काचे राज्य मिळू नाही. महाभारत घडलं! कौरवांच्या त्या अधर्मामुळे जिथे एका स्त्रीची आणि स्वतःच्या वाहिनीचीच भर सभेत अब्रू काढली गेली. पण त्या युद्धात अधर्म इतक्या पटीने वाढला की ज्यांनी सत्कर्माचा संदेश संपूर्ण आयुष्यभर दिला, त्यांनी देखील युद्धात अधर्मच केला.
चक्रव्यूहात अभिमन्यू अडकला असताना कौरवसेनेतील सहा महारथींनी युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन त्याची हत्या केली. मुळात, यात स्वतः द्रोणही होते. त्या निर्घृण हत्येमुळे सप्तऋषींना तात्काळ कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जावे लागले आणि द्रोणांनी केलेल्या अधर्मामुळे त्यांना युद्ध सोडावे लागले पण अशामध्ये पांडवांकडूनही अधर्म झाला. सत्यवादी असणाऱ्या युद्धिष्ठिराच्या मुखातून ‘अश्वत्थामा मेला!’ असे खोटे वधवून घेण्यात आले. ध्यानामध्ये गेलेल्या द्रोणांचा शिरच्छेद करण्यात आला. भीष्मांना मारण्यासाठी त्यांच्यासमोर शिखंडीला उभे करण्याची वेळ आली. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले असता वार करणे उचित नव्हते पण वार झाला आणि घाताने कर्ण मारला गेला.
युद्ध झाल्यावर अश्वत्थामाने द्रौपदीच्या पाच पुत्रांची हत्या करणे. तर जयरथाच्या वधाच्या दरम्यान श्रीकृष्णाने माया वापरणे. एक मात्र सत्य! नियमाच्या चौकटीत जर युद्ध झालं असतं तर इतिहास काही वेगळा असता. कारण पांडव सेनेची संख्या पाहता त्यांचे जिंकणे अशक्य होते.






