फोटो सौजन्य- pinterest
आजचा 19 एप्रिलचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल जी सूर्याची उच्च रास मानली जाते. यावेळी सूर्य देखील वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. त्यासोबतच चंद्रही वृषभ राशीत प्रवेश करत असल्याने गौरी योग आणि कलानिधी योग तयार होणार आहे. मालव्य राजयोगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमचे मित्रमंडळ वाढेल. वाहन मिळण्याचीही संधी असेल. तुम्ही दानधर्माच्या कार्यातही सहभागी होऊ शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जवळच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता. कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना मोठा लाभ होईल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि मजबूत होईल. सर्व भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. नोकरदार व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. जमीन किंवा घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकते. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसया करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.
अक्षय तृतीयेचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या कामात मोठे यश मिळेल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा दिवस अनुकूल ठरेल. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आज तुम्ही नवीन वाहनाची खरेदी करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.
कुंभ राशींच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ राहणार आहे. आज तुमच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होऊ शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






