फोटो सौजन्य- pinterest
अक्षय्य तृतीयाचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या पवित्र दिवशी दानधर्म करणे, कोणतेही शुभ काम करणे फलदायी मानले जाते. यादिवशी केलेल्या कामाचा क्षय होत नाही. त्यामुळेच या दिवशीचा मुहूर्त पाहून अनेक चांगल्या गोष्टींचा शुभारंभ केला जातो. पण या दिवशी आणखी दोन पद्धती आहेत. त्या म्हणजे आमरस पुरीचा नैवेद्य दाखवणे आणि पितरांना तृप्त करणे. अक्षय्य तृतीयेला आमरस-पुरीचा नैवेद्य दाखवणे आणि पितरांना तृप्त करण्याची काय आहे परंपरा जाणून घ्या
अक्षय्य तृतीयेला आमरस-पुरीचा बेत आणि पितरांना नैवेद्य देण्यामागे ऋतूचक्र, आरोग्य आणि धार्मिक परंपरा कारणीभूत आहेत. हा सण वैशाख महिन्यात येतो, जेव्हा आंबा पूर्णपणे पिकून रसाळ होतो आणि उष्णता वाढलेली असते. शरीराला थंडावा देण्यासाठी आमरस आणि पचनासाठी पुऱ्या हा परिपूर्ण आहार मानला जातो.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण, प्रत्येक मुहूर्त आणि प्रत्येक खाद्यपरंपरेमागे एक सखोल सांस्कृतिक, ऋतूचक्राशी निगडित आणि आध्यात्मिक आशय दडलेला आहे. “आमरस–पुरीचे जेवण” आणि त्या दिवशी “पितरांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा” हीदेखील अशीच बहुआयामी परंपरा आहे. ती केवळ चव किंवा रूढीपुरती मर्यादित नसून, निसर्ग, कुटुंबव्यवस्था आणि पूर्वजांप्रती कृतज्ञता यांचा संगम आहे.
आमरस पूरी सण-समारंभांमध्ये, खास करून अक्षय्य तृतीया किंवा इतर शुभ मुहूर्तांवर केले जाते. आंबा हा भारतीय संस्कृतीत “फळांचा राजा” मानला जातो. उन्हाळ्याच्या प्रारंभी आंबा पिकतो आणि त्याचवेळी अनेक शुभ कार्यांना प्रारंभ होतो. त्यामुळे आंब्याचा समावेश हा समृद्धी, नवीनतेचा प्रारंभ आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो.
हंगामी फळ (Seasonal Fruit): या काळात आंबा बाजारात मुबलक आणि परिपक्व होतो. नवीन फळाचे स्वागत म्हणून पहिला मान आंब्याला दिला जातो. या दिवशी आंब्याचे पूजनही करून मग त्याचे आमरस केले जाते. तसेच त्याचे आरोग्यदायी लाभ ही आहेत. उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा आणि थंडावा देण्यासाठी आंब्याचा रस उत्तम असतो. यासोबत गव्हाच्या पुऱ्या पचनास मदत करतात. तसेच एक स्वादिष्ट जेवण होते.
भारतीय संस्कृती पाउलो पावली कृज्ञता व्यक्त केली जाते. निसर्गाचे तर कधी पर्वत, वृक्ष, पाने, फुले, प्राणी यांच्या प्रति व्यक्त केली जाते. जसं भाद्रपद महिन्यात पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच आजच्या दिवशी ही पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. नैवेद्याद्वारे पितरांना तृप्त करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो, जेणेकरून कुटुंबात सुख-समृद्धी राहते.
या दिवशी दिलेल्या दानाचा किंवा अर्पण केलेल्या नैवेद्याचे पुण्य ‘अक्षय’ (कधीही न संपणारे) असते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी थोडं तरी दान करावे, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हा सण वैशाख महिन्यात येतो, जेव्हा आंबा पिकलेला असतो. त्यामुळे हंगामी फळ म्हणून आमरस अर्पण केला जातो आणि तो समृद्धी व आनंदाचे प्रतीक मानला जातो.
Ans: आमरस शरीराला थंडावा आणि ऊर्जा देतो, तर पुरी पचनास मदत करते. उन्हाळ्यात हा आहार संतुलित मानला जातो.
Ans: होय, हा पूर्णपणे सात्विक आणि शुद्ध अन्न मानला जातो, जो देवाला अर्पण करण्यासाठी योग्य आहे.






