(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव
विंडसर कॅसल, इंग्लंड
हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा रहिवासी किल्ला असल्याचे मानले जाते. किल्ला अंदाजे १३ एकर परिसरात पसरलेला असून इथे तुम्हाला शाही खोल्या आणि भव्य परिसर पाहायला मिळेल. इथे सेंट जॉर्ज चॅपल नावाचे एक प्रार्थनास्थळ आहे, जिथे शाही विवाहसोहळे आणि अंत्यसंस्कार पार पडतात. हा किल्ला वर्षभर पर्यटकांसाठी खुला असतो पण उन्हाळ्यात आणि विशेष शाही कार्यक्रमांच्या वेळी येथे गर्दी होण्याची शक्यता असते.
बाल्मोरल कॅसल, स्कॉटलंड
स्कॉटलंडमध्ये वसलेले बाल्मोरल कॅसल हे ब्रिटिश राजघराण्याचे खाजगी निवासस्थान आहे. साल १८५२ मध्ये राणी व्हिक्टोरियासाठी या किल्ल्याला खरेदी करण्यात आले होते. राणी एलिझाबेथ द्वितीय अनेकदा येथे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी येत होत्या. त्यांचे निधनही याच ठिकाणी झाले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्कॉटिश रचनेसाठी आणि ५०,००० एकरच्या विस्तीर्ण परिसरासाठी ओळखला जाणारा हा किल्ला, त्याच्या खास स्कॉटिश वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी थोड्या कालावधीसाठी या ठिकाणाला खुले करण्यात येते. याकाळात पर्यटक येथील बागा आणि आतील परिसराला जवळून पाहू शकतात.
ग्लॅमिस किल्ला, स्कॉटलंड
हा किल्ला खास करुन त्याच्या आकर्षक कथांसाठी ओळखला जाते. हे तेच ठिकाण आहे जिथे राणी एलिझाबेथ यांचे बालपण गेले. याच ठिकाणी राजकुमारी मार्गारेट यांचाही जन्म झाला होता. हा किल्ला २० मार्च ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत लोकांसाठी खुला असतो. पर्यटक याकाळात तेथील भव्य खोल्या, सुंदर बागा, रेस्टॉरंट आणि भेटवस्तूंच्या दुकानाचा आनंद लुटु शकतात.
शॅटो डी चास्टेलु, फ्रान्स
शॅटो द शॅस्टेलक्स हा फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशात असलेला एक अतिशय जुना आणि ऐतिहासिक किल्ला असल्याचे मानले जाते. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो जवळजवळ १,००० वर्षांपासून एकाच कुटुंबाच्या (शॅस्टेलक्स कुटुंबाच्या) मालकीचा आहे, जी फ्रान्समधील एक दुर्मिळ गोष्ट आहे. उन्हाळ्याच्या काळात या किल्ल्याला पर्यटकांसाठी खुले करण्यात येते. इथे ते जुने ग्रंथालय आणि उद्यान पाहू शकतात.
Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या
सावरसिन किल्ला, रोमानिया
सावरसिन किल्ला हे रोमानियातील अराड परगण्यात असलेला एक शाही ठिकाण आहे. याला “सावरसिनचा शाही भाग” म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याच्या आतील भागात पर्यटकांना जाण्यास मनाई आहे पण ते येथील बागा आणि संग्रहालय निवांतपणे पाहू शकतात.






