महापालिकेच्या 1378 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेवरून भाजपचे दोन देशमुख आमदार आणि महापालिकेचे पदाधिकारी यांच्यात चांगलेच राजकारण रंगले. या योजनेच्या आडून महापालिकेने कोणत्याही प्रकारची करवाढ करू नये यासाठी भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेतली. दरम्यान, आमदार देशमुखांच्या या भेटीची कुणकुण लागल्यामुळे महापौर विनायक कोंड्याल यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन करवाढ होऊ नये देणार नाही, असे स्पष्टीकरण दिले.