Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये जपली जाणारी सीतेची अनोखी परंपरा, काय आहे राम-सीतेच्या नात्याची कथा जाणून घ्या

सध्या भारत आणि नेपाळ हे दोन वेगवेगळे शेजारी देश असले, तरी या दोन्ही देशांत रामायणकाळापासून सांस्कृतिक बंध आहेत. हजारो वर्षांपासून एक संस्कृती, एक वारसा घेऊन वाटचाल करणारे हे दोन्ही देश.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 20, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळमधील सीता मातेचे प्रसिद्ध मंदिर
  • राम-सीतेच्या नात्याची कथा
  • नेपाळमध्ये जपली जाणारी सीतेची अनोखी परंपरा
 

 

नेपाळच्या विदेह प्रांताचा प्रथम उल्लेख येतो रामायणात. बिहार आणि नेपाळच्या सीमेवरील असलेल्या विदेह राज्याची राजधानी होती प्रसिद्ध मिथिला नगरी आणि गदिमांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘मिथिलेहूनही दर्शनीय नृप होता – मिथिलेचा राजा जनक!’ आपली जनकाशी ओळख होते ते सीतेचे वडील म्हणून. रामायणाची नायिका सीता अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. जनकाची कन्या म्हणून जानकी. मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली आणि विदेहची नागरिक म्हणून वैदेही. ही रामाची भार्या रामाशी इतकी एकरूप झाली, की यांच्या अद्वैताला एकच नाव मिळाले – सियाराम!

॥ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥

जनकपूरचे धार्मिक महत्त्व

नेपाळने आपल्या कन्येवर प्रेम केलेच, तसेच सीतामैय्या म्हणून तिची भक्तीसुद्धा केली. सीतेची भक्ती करणारा एक संप्रदाय नेपाळमध्ये आहे. आज जनकपूर या गावी सीतेचे मोठे मंदिर आहे – जानकी मंदिर. असे मानले जाते की, इथे जनकाचा दरबार भरत असे. या ठिकाणी रामाने शिवधनुष्य तोडले होते व राम-सीतेचा विवाहदेखील इथेच झाला होता. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला राम-सीतेचा विवाह झाला होता, अशी मान्यता आहे. हा दिवस विवाह पंचमी म्हणून इथे साजरा केला जातो. या दिवशी भारत व नेपाळमधील हजारो भक्त जानकी मंदिराला भेट देण्यासाठी येतात.

स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? भक्तांसाठी हा दिवस आहे खास, जाणून घ्या

नेपाळची राम-सीतेवरील श्रद्धा

नेपाळने सीतेवर प्रेम केले, तसेच रामावरसुद्धा प्रेम केले. पण आंधळेपणाने नाही. नेपाळने डोळसपणे रामाची भक्ती केली. आज रामाचे वचन, नेपाळचे ब्रीद वाक्य आहे. ॥ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥

Chandra-Guru Yuti: नवरात्रीत चंद्र-गुरु योगाने चमकणार या राशीच्या लोकांचे नशीब, तुम्हाला होईल फायदा

मातृभूमीला स्वर्गाहून महान मानणाऱ्या, योद्धा संन्याशाला दैवत मानणाऱ्या, साधुसंतांना मान देणाऱ्या, आपल्या पुत्रांची कदर करणाऱ्या आणि आपल्या श्रेष्ठ पुत्रांवरील प्रेम कृतीतून दाखवणाऱ्या नेपाळकडून आपण खूप काही शिकण्याची गरज आहे, हे लक्षात येते. भारताने आपल्या राष्ट्रपुरुषांना ओळखून त्यांचे शब्द प्रमाण मानून त्यांना आपल्या कृतीतून आदरांजली वाहणे नितांत आवश्यक आहे. तसे पाहता राम हा आपला आद्य राष्ट्रपुरुष आहे. पण त्याचे जन्मस्थानच काय, त्याचे चरित्र, त्याचे ऐतिहासिकत्वसुद्धा कथित विद्वानांच्या बुद्धीने गौरवाचा, स्वाभिमानाचा विषय न करता वादाचा विषय केला आहे.

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळमधील पवित्र काली गंडकी नदीतून दोन अत्यंत दुर्मिळ व प्राचीन (सुमारे ६ कोटी वर्षे जुने) शाळीग्राम आणले गेले होते. हे दगड जनकपूर (नेपाळ), जिथे सीता मातेचा जन्म झाला, येथून मागवण्यात आले होते आणि त्यांचा वापर मूर्ती कोरण्यासाठी करण्यात आला होता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळमध्ये सीतेची परंपरा का खास मानली जाते?

    Ans: नेपाळमध्ये सीता हिला “जानकी माता” म्हणून पूजले जाते. ती जनकाची कन्या आणि मिथिलेची राजकन्या असल्यामुळे नेपाळशी तिचा थेट संबंध जोडला जातो.

  • Que: नेपाळमध्ये रामायणाचा प्रभाव कसा आहे?

    Ans: नेपाळच्या संस्कृतीत रामायणाचा खोल प्रभाव आहे. धार्मिक सण, कथा आणि परंपरांमध्ये राम-सीतेच्या जीवनाचे महत्त्व दिसून येते.

  • Que: ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ या वाक्याचे महत्त्व काय?

    Ans: ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ या वाक्याचे महत्त्व काय?

Web Title: Mata sita temple nepal what is the story of ram sita relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Ramayana: निस्वार्थी आणि विश्वासू मैत्रीची कहाणी, रामायणातील मैत्रीचा आदर्श जाणून घ्या
1

Ramayana: निस्वार्थी आणि विश्वासू मैत्रीची कहाणी, रामायणातील मैत्रीचा आदर्श जाणून घ्या

Tri Ekadash Yog: बुध आणि चंद्र तयार करणार त्रिएकादश योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा
2

Tri Ekadash Yog: बुध आणि चंद्र तयार करणार त्रिएकादश योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Khandoba: खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते? काय आहे यामागील कारण जाणून घ्या
3

Khandoba: खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते? काय आहे यामागील कारण जाणून घ्या

Chaitra Navratri 2026: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्णामांडाला या गोष्टीचा दाखवा नैवेद्य
4

Chaitra Navratri 2026: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्णामांडाला या गोष्टीचा दाखवा नैवेद्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.