
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
महाराजांचे प्रिय शिष्य, नवल नागरी बाबा यांनी त्यांना एक प्रश्न विचारला: भूत कसे दिसतात आणि कोण भूत बनतं?या प्रश्नावर महाराजांनी उत्तर दिलं की, “आम्ही वृंदावनात अनेक भूतं पाहिली आहेत. जसं की जेव्हा कोणी आत्महत्या करतं, अचानक अपघात होतो किंवा गंभीर पापं केलेसी असतात. खरं तर, हे ठिकाण भगवान भूतेश्वरांच्या अधिपत्याखाली असल्याचं मानलं जातं. मथुरेमध्ये राहणारे तेच भगवान भूतेश्वर वृंदावनावर राज्य करतात”
नवल नगरी पुढे विचारतात, “भूत कशी दिसतात?” या प्रश्नाचे उत्तर देताना महाराजजींनी सांगितलं की, “त्यांचे रूप प्रत्येक क्षणी बदलत असते. जर ते महिला रुपात दिसले तर त्यांचं मुळ रुप हे तसंच असेल. एका मिनिटांत, ते एका भयानक स्वरूपात रूपांतरित होऊ शकतात, किंवा दुसऱ्या मिनिटात, ते पूर्णपणे घृणास्पद स्वरूपात रूपांतरित होऊ शकतात, किंवा अचानक एका अतिशय सुंदर स्वरूपात रूपांतरित होऊन ते तुमच्या समोर येऊ शकतात.”
या प्रश्नावर पुढे प्रेमानंद महाराज हसून म्हणतात, “जर त्याला असे वाटत असेल की तू त्याचं कल्याण करशील, तरच तो तुला भेटेल. पण जर त्याला असे वाटलं की तु त्याला पाहून स्वतःचाच जीव सोडून भूत बनशील, तर तो तुला का भेटेल? जर त्याला असे वाटत असेल की जर आपण त्याला पाहिले आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला तर तो का येईल? तो येणार नाही. तो फक्त तिथेच जातो जिथे त्याचं कल्याण होईल.”
महाराज पुढे म्हणतात, “भूतांच्या जगात इतकं दुःख आहे की नद्या वाहत असल्या तरी ते पाण्याचा एक थेंबही पिऊ शकत नाहीत किंवा अन्नाचा एक घासही खाऊ शकत नाहीत. ते स्वतःच्या मुक्तीसाठी संतांकडे जातात. तामसिक गुणाने ग्रस्त असलेल्या प्राण्यांवर त्यांचा जास्त प्रभाव असतो. जी लोकं चुकीचं वागतात आणि वाईट कृत्यं करतात त्यांच्यावर भूतांचा प्रभाव असतो”
“पण असे भूत कोणालाही स्पर्श करू शकत नाहीत. नाम आणि मंत्र जप करणाऱ्याला भूत स्पर्श करू शकत नाही. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते; त्यांनी तसं करण्याचा प्रयत्न केला तर ते राखेत नष्ट होउ शकतात. म्हणूनच असे म्हटले जाते की, ‘भूत आणि पिशाच जवळ येत नाहीत.’ म्हणून, घाबरू नका. देवाचे नाव आणि देवाच्या भक्तांच्या नावाचा जप केल्याने कोणतीही नकारात्मक शक्ती जवळ येऊ शकत नाही. देवाचे नाव आणि त्याच्या भक्तांमध्ये अफाट शक्ती आहे.”
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.