फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्षाकडून आपल्या सर्वांच्या मनात नव्या आशा असतात. ज्या लोकांना मूलबाळ नाही आणि जे संततीसुखापासून वंचित आहेत, त्यांच्या मनात नवीन वर्षाकडून खास अपेक्षा असतील. अशा लोकांसाठी संततीसुख मिळण्यासाठी काही खास उपाय सांगत आहोत. एकादशीच्या दिवशी संततीप्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे जाणून घ्या
पंचांगानुसार, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात 30 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता सुरू होणार आहे. या एकादशी तिथीची समाप्ती 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता होणार आहे. अशा वेळी हे व्रत 30 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे. वैष्णव परंपरेचे पालन करणारे लोक 31 डिसेंबर रोजी हे व्रत पाळणार आहे.
संततीसुख मिळण्यासाठी एकादशीचे व्रत करायला सुरू करा. हे व्रत केल्याने लवकरच तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद लाभेल आणि तुम्हाला संततीसुख प्राप्ती होईल. प्रत्येक एकादशीला व्रत केल्यानंतर अन्न आणि वस्त्र यांचे दान करावे आणि मगच व्रत सोडावे. हा उपाय केल्याने तुमच्या घरी लवकरच गुड न्यूज येईल.
ज्योतिषशास्त्रामध्ये रुईचा संबंध ग्रहांचा राजा सूर्याशी आहे आणि सूर्य हा जीवनाचा कारक मानला गेला आहे. शुक्रवारी रुईची मुळे एका लाल कापडात बांधून ते कंबरेला बांधावे. हा उपाय कोणालाही न सांगता आणि कोणीही पाहणार नाही, अशा प्रकारे करावा. या उपायाच्या मदतीने लवकरच तुमचे अंगण आनंदाने भरून जाईल.
संतती सुख मिळण्यासाठी नवीन वर्षी प्रत्येक रविवारी हा उपाय करायला सुरुवात करावी. तांब्याच्या पात्रात लाल चंदन टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. हा उपाय केल्याने लवकरच आई-वडील बनण्याचे सुख मिळेल.
प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या उपायाने देवता आणि पितृगणही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि संततीसुखासाठी आशीर्वाद देतील. हा उपाय कमीतकमी 11 शनिवार केल्याने मनोकामना पूर्ण होईल.
नवीन वर्षात प्रत्येक शुक्रवारी कमीतकमी 5 कन्यांना खीर द्यावी. या कन्यांना तुमच्या घरी बोलवा आणि श्री लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करून या कन्यांना खीर खायला द्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: या दिवशी उपवास ठेवून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी, विष्णु सहस्रनाम पठण करावे आणि केळी, तुळस अर्पण करावी.
Ans: पती-पत्नीने एकत्र पूजा, उपवास आणि विष्णू पूजन केल्यास संततीसंबंधी अडचणी दूर होतात.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीचे व्रत केल्याने संतानसुख, कुटुंबातील आनंद आणि समृद्धी प्राप्त होते.






