Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास

मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता असलेल्या सातेरी देवीचे हे मंदिर सुमारे ७०० वर्षे जुने आहे. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात यात्रा भरते ती सातेरी देवीची. ही सातेरी देवी कशी प्रगट झाली. याविषयी जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 26, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 700 वर्षे जुने असलेले सातेरी देवीच्या मंदिराचा काय आहे इतिहास
  • काय आहे या देवीची आख्यायिका
  • सातेरी देवीची आषाढ महिन्यात भरते यात्रा
 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या बिळवस वाडीत वसलेले श्री सातेरी देवीचे जलमंदिर हे कोकणातील एक अद्वितीय आणि प्राचीन देवस्थान मानले जाते. मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता असलेल्या सातेरी देवीचे हे मंदिर सुमारे ७०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले असल्यामुळे या मंदिराला ‘जलमंदिर’ म्हणून ओळखले जाते आणि कोकणातील अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर मानले जाते.

स्थानिक परंपरेनुसार एका जैन भक्ताने या मंदिराची उभारणी केली. मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात प्रशस्त मंडप आणि सभामंडप आहे. पूर्वी गाभाऱ्यात मूर्ती नव्हती; तेथे असलेल्या उंच वारुळाची पूजा केली जात असे. या वारुळात देवी शेषरूपाने वास करते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. मंदिर परिसरातील विहीरवजा कुंड कधीही आटत नाही. या कुंडात भारतातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांतील नद्यांचे पाणी मिसळले असल्याची लोकश्रद्धा आहे. कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंडही आहे.

काय आहे या देवीची आख्यायिका

मंदिराबाबत एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी तलावातील वारुळाजवळ जनावरे पाणी पिण्यास येत असत. एकदा त्या वारुळातून रक्त वाहू लागले. त्यानंतर एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन वारुळावर मंदिर बांधण्याची आज्ञा केली. ग्रामस्थांनी हा आदेश मानून या ठिकाणी देवालय उभारले.

Satai Devi: कोकणातील हजारो कुटुंबांची कुलदेवता, जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि महिमा

आषाढ महिन्यात जत्रा

या मंदिराचा सर्वात मोठा उत्सव आषाढ महिन्यात भरतो. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात होणारी ही दुर्मिळ यात्रा मानली जाते. यावेळी गावातील चाकरमानी, माहेरवाशिणी आणि दूरवरचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवीला विशेष अलंकार चढवले जातात, मुखवटा धारण केला जातो आणि विविध धार्मिक विधी पार पडतात. प्रत्येक घरातून नैवेद्य आणला जातो आणि भक्तिभावाने गाऱ्हाणी घातली जातात.

यात्रेतील अनेक पारंपरिक विधी आजही जतन केले गेले आहेत. देवीसमोर ठेवलेले मडकं मिरवणुकीने गांगोची राय येथे नेले जाते. नैवेद्याचा प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो. रात्री देवीचे अलंकार पेटाऱ्यात ठेवून मानकऱ्यांकडे नेले जातात. दुसऱ्या दिवशी धार्मिक विधींनंतर यात्रेची सांगता होते.

Waghjai Devi: कोण आहे वाघजाई देवी, जाणून घ्या या देवीचा महिमा

मसुरे गावातील इतर देवकार्यांपूर्वी सातेरी देवीची ओटी भरण्याची परंपरा आजही पाळली जाते. दत्तमंदिर, म्हातारीची राई, गांगोची राई यांसारख्या अन्य देवस्थानांनी समृद्ध असलेल्या बिळवसचे हे जलमंदिर कोकणाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातेरी देवीचे मंदिर कुठे आहे?

    Ans: सातेरी देवीचे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावातील बिळवस वाडीत आहे.

  • Que: सातेरी देवीचे मंदिर 'जलमंदिर' म्हणून का ओळखले जाते?

    Ans: मंदिर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले असल्यामुळे त्याला 'जलमंदिर' म्हटले जाते. कोकणातील अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर मानले जाते

  • Que: सातेरी देवी कशी प्रकट झाली, अशी श्रद्धा आहे?

    Ans: लोकश्रद्धेनुसार वारुळातून रक्त वाहू लागल्यानंतर देवीने एका ग्रामस्थाला स्वप्नात दृष्टांत देऊन त्या ठिकाणी मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानंतर येथे देवालय उभारण्यात आले.

Web Title: Sateri devi temple history of the 700 year old temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • kokan

संबंधित बातम्या

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?
1

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?
2

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला चुकूनही ‘या’ वस्तू घरात आणू नका;  नाहीतर वाढू शकतात अडचणी
3

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला चुकूनही ‘या’ वस्तू घरात आणू नका; नाहीतर वाढू शकतात अडचणी

Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान मानले जाते शुभ; जाणून घ्या दानाचे महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान मानले जाते शुभ; जाणून घ्या दानाचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.