Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shardiya Navratri 2025: नवरात्रीत नऊ धान्य पेरण्याचं शास्त्र काय? काय आहे याचा अर्थ ?

Shardiya Navratri 2025: नवरात्रीत नऊ धान्य पेरण्याची प्रथा अतिशय प्राचीन असून तिला बीजारोपण किंवा नवधान्य पेरणी असेही म्हणतात. नवरात्री हा शक्तीपूजेचा सण आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 22, 2025 | 03:20 AM
Shardiya Navratri 2025:  नवरात्रीत नऊ धान्य पेरण्याचं शास्त्र काय? काय आहे याचा अर्थ ?
Follow Us
Follow Us:

शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. ही नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर म्हटला जातो. या नवरात्रीत घट बसवले जातात. या घटाची पूजा त्याचं महत्व अनंन्यासाधारण आहे. हे घट म्हणजे नऊ धान्य मातीत पेरले जातात. नवरात्रीत नऊ धान्य पेरण्याची प्रथा अतिशय प्राचीन असून तिला बीजारोपण किंवा नवधान्य पेरणी असेही म्हणतात. नवरात्री हा शक्तीपूजेचा सण आहे.

या काळात मातेला निसर्गशक्तीचे रूप मानून अन्नसंपन्नतेची प्रार्थना केली जाते. पहिल्या दिवशी घटस्थापनेसोबत स्वच्छ मातीत नऊ प्रकारची धान्ये पेरली जातात. प्रदेशानुसार धान्ये थोडीफार बदलतात, परंतु गहू, ज्वारी, तांदूळ, मटकी, हरभरा, तूर, मूग, तीळ आणि चणा ही नऊ धान्ये सर्वसाधारणपणे वापरली जातात. ही नऊ धान्ये नऊ ग्रह आणि पंचमहाभूतांचे प्रतीक मानली जातात.

घटस्थापनेचं महत्व काय ?

घटस्थापनेतील नारळ हा स्त्रीच्या गर्भाशयाचं आणि पृथ्वीतत्वाचं प्रतीक मानलं जातं. भारतीय हिंदू संस्कृतीनुसार स्त्री आणि जमीन यांना मातेचा दर्जा दिला जातो. जसं स्त्रीच्या उदरातून नवा जीव जन्माला येतो त्याचप्रमाणे तसंच धान्याचं बीज जमीनीच्या पोटात अंकुरतात. म्हणूनच घटस्थापना करताना धान्य देखील पेरली जातात.

याबाबतची माहिती किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ओमकार सावंत यांनी दिली आहे. नवरात्र म्हणजे फक्त स्त्रीशक्तीची पूजा नाही तर प्रजनन, सृजनशीलता आणि सुफलता याचं महत्व पटवून देतं. निसर्ग नवनिर्मिती आणि प्रसुतीचा सोहळा साजरा करतो. स्त्री आणि भूमी यांच्यात जीव जन्माला घालण्याचं सामर्थ्य आहे. या दोन्ही शक्ती आहेत म्हणून आपण जीवंत आहोत. या स्त्रितत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Shardiya Navratri: शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्या रंगांचे कपडे परिधान करणे असते शुभ, जाणून घ्या 

धार्मिक दृष्टिकोनातून या पेरणीला विशेष महत्त्व आहे. नऊ दिवसांत बीज उगवण्याची प्रक्रिया म्हणजे देवीच्या शक्तीचा उत्सव मानला जातो. तसेच शेतीचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे याची जाणीव करून देणारी ही सुंदर परंपरा आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, घरात उगवलेली हिरवी रोपे ऑक्सिजन निर्माण करतात, घरातील हवेत ताजेपणा आणतात आणि निसर्गाशी आपले नाते दृढ करतात.अशा प्रकारे नवरात्रीतील नऊ धान्य पेरणी ही केवळ धार्मिक विधी नसून निसर्ग, शेती, पर्यावरण आणि सकारात्मक उर्जेचे एकत्रित शास्त्र आहे. ही पेरणी म्हणजे देवीला वंदन करण्याबरोबरच पृथ्वीच्या सुपीकतेचे आणि अन्नसंपन्नतेचे आभार मानण्याची सुंदर परंपरा आहे.

Shardiya Navratri 2025: भक्ताने घातली शपथ अन्… ; आई तुळजा भवानीच्या तुळजापूरातील मंदिराची ‘अशी’ आहे आख्यायिका

Web Title: Sharadiya navratri 2025 what is the science of sowing nine grains in navratri what is the meaning of it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 03:20 AM

Topics:  

  • Navratri 2025
  • Religion
  • Tuljabhavani

संबंधित बातम्या

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
1

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ
2

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
3

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी
4

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.