फोटो सौजन्य- फेसबुक
सनातन शास्त्रांमध्ये मंगळा गौरी व्रताचा उल्लेख आहे. श्रावण महिन्यामध्ये हे व्रत पाळले जाते. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी मंगळा गौरी व्रत पाळले जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख-शांती नांदते, अशी धार्मिक मान्यता आहे.
हेदेखील वाचा- राहुचा प्रकोप झालाय तर चांदीच्या ग्लासातून प्या पाणी, आरोग्य आणि नशीब दोन्ही चमकेल
श्रावण महिन्यातील सर्व मंगळवारी मंगळा गौरी व्रत पाळण्याची परंपरा आहे. हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या वेळी श्रावण महिन्यामधील पहिले मंगळा गौरी व्रत 6 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. मान्यतेनुसार, हे व्रत पाळल्यास विवाहित महिलांना देवी पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्हालाही सुखी वैवाहिक जीवन हवे असेल, तर मंगळा गौरी व्रताच्या पूजेच्या वेळी जानकीने लिहिलेल्या पार्वती स्तोत्राचे पठण करा. यामुळे व्यक्तीला शुभ परिणाम मिळतील.
हेदेखील वाचा- नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व, मंत्र
मंगळा गौरी व्रत 2024 आणि शुभ मुहूर्त
मंगळागौरी व्रत शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीच्या ब्रम्ह मुहूर्तावर 4 वाजून 21 मिनिटांपासून ते 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत पाळले जाईल. त्यावेळी अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून 12 वाजून 53 मिनिटांपर्यंत असेल.
।।जानकी कृत पार्वती स्तोत्र।।
”जानकी उवाच”
शक्तिस्वरूपे सर्वेषां सर्वाधारे गुणाश्रये।
सदा शंकरयुक्ते च पतिं देहि नमोsस्तु ते।।
सृष्टिस्थित्यन्त रूपेण सृष्टिस्थित्यन्त रूपिणी।
सृष्टिस्थियन्त बीजानां बीजरूपे नमोsस्तु ते।।
हे गौरि पतिमर्मज्ञे पतिव्रतपरायणे।
पतिव्रते पतिरते पतिं देहि नमोsस्तु ते।।
सर्वमंगल मंगल्ये सर्वमंगल संयुते।
सर्वमंगल बीजे च नमस्ते सर्वमंगले।।
सर्वप्रिये सर्वबीजे सर्व अशुभ विनाशिनी।
सर्वेशे सर्वजनके नमस्ते शंकरप्रिये।।
परमात्मस्वरूपे च नित्यरूपे सनातनि।
साकारे च निराकारे सर्वरूपे नमोsस्तु ते।।
क्षुत् तृष्णेच्छा दया श्रद्धा निद्रा तन्द्रा स्मृति: क्षमा।
एतास्तव कला: सर्वा: नारायणि नमोsस्तु ते।।
लज्जा मेधा तुष्टि पुष्टि शान्ति संपत्ति वृद्धय:।
एतास्त्व कला: सर्वा: सर्वरूपे नमोsस्तु ते।।
दृष्टादृष्ट स्वरूपे च तयोर्बीज फलप्रदे ।
सर्वानिर्वचनीये च महामाये नमोsस्तु ते।।
शिवे शंकर सौभाग्ययुक्ते सौभाग्यदायिनि।
हरिं कान्तं च सौभाग्यं देहि देवी नमोsस्तु ते।।
फलश्रुति
स्तोत्रणानेन या: स्तुत्वा समाप्ति दिवसे शिवाम्।
नमन्ति परया भक्त्या ता लभन्ति हरिं पतिम्।।
इह कान्तसुखं भुक्त्वा पतिं प्राप्य परात्परम्।
दिव्यं स्यन्दनमारुह्य यान्त्यन्ते कृष्णसंनिधिम्।।
।।श्री ब्रह्मवैवर्त पुराणे जानकीकृतं पार्वतीस्तोत्रं सम्पूर्णम्।।
गौरी मंत्र
ॐ देवी महागौर्यै नमः।।
ध्यान मंत्र
वन्दे वाञ्छित कामार्थे चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारूढा चतुर्भुजा महागौरी यशस्विनीम्।।
पूर्णन्दु निभाम् गौरी सोमचक्रस्थिताम् अष्टमम् महागौरी त्रिनेत्राम्।
वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्।।
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालङ्कार भूषिताम्।
मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल मण्डिताम्।।
प्रफुल्ल वन्दना पल्लवाधरां कान्त कपोलाम् त्रैलोक्य मोहनम्।
कमनीयां लावण्यां मृणालां चन्दन गन्धलिप्ताम्।






