Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar 2026: १५ जूनची तारीख ठरणार टर्निंग पॉईंट! ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार

Surya Gocher will bless 4 Zodiacs: १५ जून २०२६ रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार असून, या गोचराचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. विशेषतः मेष, सिंह, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा आणि नवीन संधींच्या बाबतीत सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळू शकतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 13, 2026 | 07:15 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा, सरकारी कामे आणि करिअरचे प्रतिनिधित्व करणारा सूर्य १५ जून २०२६ रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार असला तरी काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, या गोचरामुळे करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठेत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात.

Vastu Tips: भाग्य उजळेल! घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप; वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे गोचर अत्यंत शुभ मानले जात आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर व्यवसायिकांना नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भावंडांशी संबंध अधिक दृढ होऊ शकतात. तुमच्या मनातील भीती दूर होईल, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल

सिंह राशी

सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुलू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात किंवा एखादी प्रतिष्ठित व्यक्ती तुमच्या मदतीला येऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल आणि प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीची संधीही निर्माण होईल.

कन्या राशी

सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश कन्या राशीच्या कर्मभावावर प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता असून व्यावसायिक प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो. तुमच्या प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील आणि तुमच्या मेहनतीला मान्यता मिळेल.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींना स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत मिळेल. विरोधकांवर मात करण्याची क्षमता वाढेल आणि आर्थिक बाबतीतही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ तुलनेने अनुकूल राहण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

विद्यार्थी, कलाकार आणि सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन कल्पना आणि कौशल्यांच्या जोरावर यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक आयुष्यातही सकारात्मक वातावरण राहू शकते.

सूर्य गोचर ठरू शकते परिवर्तनाचे कारण

सूर्याचे मिथुन राशीत होणारे हे प्रवेश अनेकांसाठी नवीन संधी, प्रगती आणि आत्मविश्वास घेऊन येणारे ठरू शकते. विशेषतः मेष, सिंह, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळू शकतात. त्यामुळे १५ जूनपासून सुरू होणारा हा कालावधी या राशींसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

Vastu Tips: घरात सुख-समृद्धी हवी? स्वयंपाकघरात कायम ठेवा ‘या’ गोष्टी, राहील माता अन्नपूर्णेची कृपा

Web Title: Surya gochar 2026 sun transit gemini lucky zodiac signs career money growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • astrology news
  • hindu religion
  • religion news

संबंधित बातम्या

Silver Ganesh Idol: चांदीचे गणपती घरात आणतात बरकत! स्थापना केल्याने मिळू शकतात ‘हे’ खास फायदे
1

Silver Ganesh Idol: चांदीचे गणपती घरात आणतात बरकत! स्थापना केल्याने मिळू शकतात ‘हे’ खास फायदे

Guru-Chandra Yog: गुरु-चंद्राचा शुभ संयोग! या राशींच्या लोकांना मिळणार धनलाभाची संधी
2

Guru-Chandra Yog: गुरु-चंद्राचा शुभ संयोग! या राशींच्या लोकांना मिळणार धनलाभाची संधी

Radha Ashtami: राधाष्टमीला घरी आणा ‘या’ ५ वस्तू; घरात नांदेल सुख समृद्धी
3

Radha Ashtami: राधाष्टमीला घरी आणा ‘या’ ५ वस्तू; घरात नांदेल सुख समृद्धी

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.