फोटो सौजन्य- pinterest
सोमवार, 2 मार्च रोजी शुक्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे. त्या राशीत आधीच शनि उपस्थित आहे. शुक्राचा त्याच्या उच्च राशीत, मीन राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. याव्यतिरिक्त, कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीत शुक्राचे उच्च स्थान शनिसह केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे.
केंद्र त्रिकोण राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि भौतिक सुखसोयी मिळतील. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे काही राशींना लक्षणीय फायदा होणार आहे. यावेळी शुक्र ग्रह 26 मार्चपर्यंत शुक्र राशीत राहणार आहे. त्यानंतर तो मेष राशीमध्ये संक्रमण करेल. म्हणजे या 25 दिवसांमध्ये या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा केंद्र आणि त्रिकोण घरांचे स्वामी शुभ स्थितीत येतात तेव्हा राजयोग तयार होतो. मीन राशीत शुक्र ग्रह उच्च मानला जातो आणि त्या राशीत शनिची उपस्थिती आधीच या युतीला अधिक शक्तिशाली बनवते. ही युती 26 मार्चपर्यंत राहील, या दरम्यान अनेक लोकांना त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबींशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात.
मेष राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांची संपत्ती वाढेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. या काळात लग्न करू इच्छिणाऱ्यांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकेल.
वृषभ राशीच्या लोकांचा या काळामध्ये त्रास संपेल. हा काळा वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. या काळात व्यवसायातील लोकांना फायदा होईल. त्याचबरोबर तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग प्रभावशाली राहणार आहे. या काळात तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील. धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक प्रगतीचा अनुभव येईल. जीवनात आनंद येईल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळू शकेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जन्मकुंडलीतील केंद्र (१, ४, ७, १०) आणि त्रिकोण (१, ५, ९) स्थानांचे स्वामी ग्रह एकत्र येणे किंवा परस्पर दृष्टी देणे यामुळे तयार होणारा शुभ योग म्हणजे केंद्र-त्रिकोण राजयोग. हा योग भाग्य, प्रतिष्ठा आणि प्रगती देणारा मानला जातो.
Ans: या काळात नोकरीत पदोन्नती, पगारवाढ, वरिष्ठांचे सहकार्य आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढते.
Ans: केंद्र त्रिकोण राजयोगाचा मेष, वृषभ आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार






