फोटो सौजन्य- pinterest
झोप न येणे आणि निद्रानाश या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागते. झोपेच्या कमतरतेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकजण झोपेच्या गोळ्या घेतात. तज्ज्ञांच्या मते, अनेक वेळा झोपेची कमतरता केवळ तणावामुळेच नाही तर वास्तूदोषांमुळेही होऊ शकते.
वास्तूशास्त्रानुसार घरातील वास्तूदोषांमुळे घरातील सदस्यांची झोप नीट होत नाही. वास्तूशास्त्रात चांगल्या झोपेसाठी अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्याने झोपेची समस्या दूर होऊ शकते. दिवसभराच्या गजबजाटानंतर माणसासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची ठरते, परंतु आजच्या काळात बहुतेक लोक नीट झोप न लागण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. पाहिले तर व्यस्त जीवनशैली आणि मानसिक ताण ही यामागची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय बेडरूमच्या चुकीच्या वास्तूमुळे अनेक वेळा झोप न येण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या बेडरूमच्या वास्तूकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे.
मेष ते मीन राशीच्या लोकांनी षटतिला एकादशीला करा ‘हे’ उपाय
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा ठेवल्याने झोपेमध्ये अडथळा येतो. बेडरूममध्ये आरसा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कपड्याने झाकून ठेवा. याशिवाय बेडरुममध्ये झाडू कधीही ठेवू नये.
बरेच लोक आपल्या बेडरूममध्ये टीव्ही किंवा कॉम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवतात. तर वास्तूमध्ये ते योग्य मानले जात नाही. अशा परिस्थितीत या गोष्टी चुकूनही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू नका, कारण असे केल्याने निद्रानाशाची समस्या वाढते.
खोलीतील पलंगाची काळजी घ्या. वास्तूशास्त्रानुसार बेडरुममध्ये बेड कधीही उत्तर-पूर्व दिशेला नसावे. यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि तुम्हाला नीट झोप येत नाही.
वास्तूशास्त्रानुसार अंथरुणावर बसून अन्न खाऊ नये. असे केल्याने झोपेचा त्रास होतो आणि चांगली झोप लागत नाही. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवण करावे. असे केल्याने मनाला शांती मिळते, प्रसन्न वाटते, त्यामुळे चांगली झोप लागते.
झोपेमध्ये वारंवार व्यत्यय येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये देशी तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने चांगली झोप लागते. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममधील पलंग लाकडाचा असावा. यासोबत चौकोनी आकाराच्या पलंगावर झोपणे चांगले मानले जाते. त्यामुळे चांगली झोप मिळते असे म्हणतात.
बेडरूममध्ये पाण्याची बाटली किंवा इतर कोणतेही भांडे कधीही ठेवू नका. वास्तविक, पाण्याचा मन आणि मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. यासोबतच जर तुमच्या बेडरूमच्या अगदी वर पाण्याची टाकी असेल तर पलंगावर कृत्रिम लाकडी छत किंवा कव्हर लावण्याची खात्री करा. त्यामुळे पाण्याचा प्रभाव कमी होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)