फोटो सौजन्य - Social Media
युद्ध ही अशी गोष्ट आहे, जी फार पूर्वीपासून चालत आली आहे. हिंदू धर्मातील, चारही युगांनी युद्ध पाहिले आहे. त्यातील काही युद्ध महाभयंकर होते. आता दोन देशांमध्ये जे युद्ध होतात त्याच्या हजार पटीने भयंकर असे युद्ध त्याकाळी होत असायचे. अशा अनके युद्धांना आपल्या धरती मातेने पाहिले आहे. येथे कधी आपल्या प्रेमासाठी युद्ध झाले आहे तर कधी कुण्या स्त्रीच्या रक्षणासाठी. कधी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युद्ध घडले आहे तर कधी ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी. कितीही अहिंसेच्या गोष्टी केल्या परंतु जेव्हा एखादी गोष्ट शिघेला पोहचते तेव्हा युद्ध हे अटळ असतं. हे युद्ध आपल्याला स्वतःला दाखवून देण्याची संधी देते. कधी युद्ध अंत ठरतं तर कधी नवीन सुरुवातीला जन्म देतं. या युद्धामध्ये प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याना कोणत्या पर्यायाचा आधार घेतो. कुणी दगाबाजी करतो तर कुणी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची धमक ठेवतो.
हे देखील वाचा : जन्माष्टमीच्या मित्रपरिवाराला द्या ‘या’ खास शुभेच्छा
पहिल्याच्या आणि आताच्या युद्धांमधील एक साम्य म्हणजे युद्धात हत्यारांचा वापर करणे. आजच्या काळात युद्धामध्ये परमाणू बॉम्ब, मिसाईल तसेच बंदुकींसारखी हत्यारे वापरतात. पूर्वीच्या काळी अशी औजारे नव्हती. युगाबद्दल म्हंटले तर त्रेतायुगात आणि द्वापरयुगात झालेल्या युद्धामध्ये अनेक सारख्या स्वरूपाची हत्यारे वापरली गेली होती. चला तर मग जाणून घेऊयात या हत्यारांबद्दल:
‘ब्रह्मास्त्र’ हे अस्त्र त्याकाळचे प्रसिद्ध अस्त्र असून खूप प्रभावशाली होते. या अस्त्राचे वर्णन रामायणात तसेच महाभारतामध्ये मिळतात. या अस्त्राचा वापर आयुष्यातून फळत एकदाच केला जात होता. त्रेतायुगात हे हत्यार बिभीषण तसेच लक्ष्मणाकडे होते. तर द्वापर युगामध्ये ब्रह्मास्त्र भगवान श्रीकृष्ण, गुरु द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, अर्जुन तसेच कुवलाश्व यांच्याकडे होते. त्याचबरोबर रामायणातील गंधर्वस्त्र खूप भयंकर अस्त्र होते. एकसाथ १४ हजार असुरांना मारण्याची ताकद असलेल्या या अस्त्राची माहिती फक्त लंकापती रावणाकडे होती. रामायणातील युद्धादरम्यान रावणाने या अस्त्राचा वापर केला असता प्रभू श्री रामांनी या अस्त्राला प्रभावहीन केले. या अस्त्राच्या वापराने युद्धात असुरांना चहूबाजूला फक्त श्री राम दिसत होते. याकारणे त्या असुरांनी एकमेकांवर वार करून जीव सोडला होता.
भगवान श्री रामांनी रामायणात मारीचला मारण्यासाठी मानवस्त्र वापरले होते. तर अमर असलेल्या रावणाला मारण्यासाठी प्रसवना या अस्त्राचा वापर केला गेला होता. लक्ष्मणाकडे देखील अनेक हत्यार होते. त्याने रावण पुत्र मेघनादवर हल्ला करताना वरुणास्त्र, सौराष्ट्रस्त्रो, महेश्वर, इंद्रस्त्र तसेच नागपाश या अस्त्रांचा वापर केला होता.