कुंडलीत असेल बुधाचा त्रास करा सोपे उपाय
बुधवार हा दिवस विघ्नांचा नाश करणाऱ्या पूज्य श्रीगणेशाचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी श्रीगणेशाची आराधना करतो त्याला विघ्न दूर करणाऱ्या बुद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. अशा स्थितीत ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असेल त्यांनी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत असे सांगितले जाते.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधाची स्थिती योग्य नसेल तर त्याला मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत बुद्ध ग्रह बलवान राहावा यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास श्रीगणेशाची कृपा होते आणि सर्व बाधा दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया ते उपाय ज्याने बुध ग्रहाला शक्ती मिळते असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी काही महत्त्वाचे उपाय दिले आहेत (फोटो सौजन्य – iStock)
हिरव्या मुगडाळीचे दान
जर तुमचा बुध ग्रह कुंडलीत कमकुवत असेल तर बुधवारी हिरवी मूगडाळ गरिबांना दान करा. याशिवाय जर तुम्ही हिरवा मूग बुधवारी खात असाल तर तेदेखील शुभ मानले जाते. असे केल्याने कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती खूप मजबूत होते. बुधवारी शिवलिंगावर हरभरा अर्पण करण्याचा सल्लाही ज्योतिषाचार्यांनी दिला आहे.
गणपती स्तोत्राचे स्तवन
गणपती स्तोत्र म्हणावे
आर्थिक समस्या असलेल्या लोकांनी दर बुधवारी गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर जीवनातील प्रगतीचे मार्ग खुले होतात. या पाठाचा जप केल्याने जीवनात सुख-समृद्धी वाढते. गणेश स्तोत्राचे पठण केल्यावर श्रीगणेशाची आरती करायला विसरू नका. यामुळे आर्थिक स्थैर्य लाभते आणि करिअरमध्ये भरभराट होते
गणपती स्तोत्र
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाष्टकम् ॥३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धीकरः प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्
संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संशयः ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम्||
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.