फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असलेले खंडोबा मंदिर म्हणजे जेजुरी. खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचं कुलदैवत मानलं जातं. रविवारी खंडोबाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. कारण रविवार हा खंडोबाचा मुख्य वार आहे. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’असा जयघोष करून पूजा केली जाते. अनेक जण खंडोबाला नवस देखील करतात आणि तो पूर्ण झाल्यावर फेडण्यासाठी लंगर मोडण्याची परंपरा प्रचलित आहे. खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते, यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया
जेजुरीमध्ये खंडोबाचा गोंधळ जर तुम्ही घातला असेल तर तेथे लंगर मोडणे हा पारंपरिक आणि श्रद्धेचा प्रकारही नक्कीच केला असेल. हा लंगर म्हणजे धातूंनी बनवलेला साखळेचा एक भाग. जो नवस पूर्ण केल्यानंतर अनेक जण मोडतात हा लंगर साखळीला लावून ही साखळी खिळ्याला लावली जाते आणि मग ती साखळी जोरात ओडून आपण आणलेला लंगर सदानंदाचा येळकोट म्हणत मोडला जातो. हा लंगर एका झटक्यात मोडला जातो. अर्धवट राहिलेला भाग घरी देवघरात ठेवून पूजला जातो.
प्रत्येक पद्धतीमागे काहीतरी कारण असतं. असं म्हणतात, जीवनातील अडचणी, संकट आणि बंधन दूर व्हावी म्हणून खंडोबाला नवस केला जातो. नवस पूर्ण झाल्यानंतर लंगर मोडून देवाचे आभार मानले जातात. साखळी मोडणे म्हणजेच बंधनातून मुक्त होणे, हे याचेच प्रतीक आहे. असेही म्हणतात लंगर मोडणे म्हणजे मनातील भीती, अडथळे आणि नकारात्मकता तोडणे आणि संकटातून बाहेर पडण्याचा आनंद व्यक्त करणे आहे. जेजुरीत गेल्यानंतर तळी भंडारा भरून अनेक जण गोंधळ देखील घालून घेतात तेव्हा हा विधी करून घेतला जातो.
लग्नानंतर अनेक जोडपी गोंधळ घालून घेतात तेव्हा नवरदेवाकडून लंगर मोडून घेतले जाते. हे मोडलेले लंगर किंवा कडी हा देवाचाच प्रसाद असून त्याची पूजा केली जाते. हा विधी करण्यासाठी खास असा दिवस नाही. तुम्ही जेव्हा जेजुरीत जाता तेव्हा लंगर मोडू शकता. जर तुम्हाला लंगरचा तुकडा अचानक मिळाला तरी तुम्ही तो घरात ठेवू शकता. लंगरचा हा तुकडा शांतता, भरभराट आणि समृद्धी आणतो, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नवस पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी आणि जीवनातील अडचणी व बंधन दूर झाल्याचे प्रतीक म्हणून लंगर मोडला जातो.
Ans: लंगर हा धातूपासून बनवलेला साखळीचा एक भाग असतो, जो नवस पूर्ण झाल्यावर मोडला जातो.
Ans: साखळी मोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे, तसेच भीती, अडथळे आणि नकारात्मकता दूर करणे असे मानले जाते.






