येत्या वर्षाच्या सुरुवातीला पंचांगांत वास्तू शांत किंवा गृहप्रवेशासाठी मुहुर्त दिले आहेत. हिंदू धर्मात असं सांगितलं जातं की, पंचांगातील मुहुर्तांनुसार वास्तूशांती केली की घरात सुख समाधान आणि धनसंपत्ती प्राप्त होते. म्हणून कोणता काळ शुभ आणि कोणता अशुभ हे पंचांगात सांगितलं आहे. सध्या शुक्र अस्त आणि खरमास काळ सुरु असल्याने आजपासून म्हणजेच 16 डिसेंबरपासून पुढील 30 दिवस कोणत्याही शुभकार्यासाठी योग्य नाही असं वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. खरमास, होलाष्टक, अधिक मास आणि श्राद्ध पक्षात गृहस्वास्थ्याचे काम देखील टाळावे. या काळात गृहप्रवेश टाळावा.
खसमास सुरु असल्याने येत्या जानेवारी महिना वास्तूशांत किंवा गृहप्रवेशासाठी योग्य नाही. या शुभकार्यासाठी तसे योग्य मुहुर्त नाहीत. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून शुभ कार्याचे मुहुर्त आहेत.
6 फेब्रुवारी 2026 – सकाळी 12:23 ते 1:18(7 फेब्रुवारी)
11 फेब्रुवारी 2026 – सकाळी 9:58 ते 10:53
19 फेब्रुवारी 2026 – रात्री 8.:52 ते सकाळी 6.55(20 फेब्रुवारी)
20 फेब्रुवारी 2026 – सकाळी 6:55 ते दुपारी 2:38
21 फेब्रुवारी 2026 – दुपारी 1:00 ते संध्याकाळी 7:07
25 फेब्रुवारी 2026 – पहाटे 2.:40 ते सकाळी 6:49 (26 फेब्रुवारी)
26 फेब्रुवारी 2026 – सकाळी 6:49 ते दुपारी 12:11
4 मार्च 2026 – सकाळी 7:39 ते 6:42 (5 मार्च)
अशी पांचांगातील शुभकार्याची यादी दिलेली आहे.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.






