कोकणातल्या धार्मिक उत्सवांपैकी एक म्हणजे भराडी देवीची उत्सव. या उत्सवासाठी आजुबाजूच्या गावातील गावकरी तसंच चाकरमानी देखील येतातच येतात. असं म्हटलं जातं की, सुमारे 400 वर्षांपूर्वी एका गावकऱ्याला दृष्टांत झाला. या गावकऱ्याची गाय रानात जाऊन एका पाषाणावर पान्हा सोडायची. एकदा या गावकऱ्याने तिच्यावर पाळत ठेवली. गायीने पान्हा सोडला तेव्हा तो पाषाण सजीव झाल्याचं दिसलं. त्या पाषाणात देवीचा अंश असल्याचा भास झाला. हा परिसर म्हणजे मसुरे गावातील भराड.
याभागत प्रकट झालेली आणि गावचं रक्षण करणारी देवी म्हणजे भराडी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली. असं म्हटलं जातं की, भराडी देवी ही आई तुळजा भवानीचं रुप आहे. तुळजाभवानी कोकणातल्या भूमीवर भराडी देवीचं रुप घेऊन प्रकटली.
याचबरोबर एक अशीही गोष्ट सांगितली जाते की, पेशवे कुळातील चिमाजी आप्पा यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्यावर देवी प्रसन्न झाली. परकिय सत्तांशी लढताना पेशव्यांना विजय प्राप्त झाला. देवीआईची कृपा फळाला आली म्हणून पेशव्यांनी 22 हजार एकर जमीन देवीच्या मंदिरासाठी दान केली आणि बघता बघता भराडी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून तिचा महिमा महाराष्ट्र आणि इतर राज्यात पसरु लागला.
उत्सवासाठी देवीला कौैल लावला जातो. देवीने कौैल दिल्याच्या नंतरच उत्सवाची तारिख ठरते. काही दंतकथेनुसार असं देखील सांगितलं जातं की, तांदळाच्या वड्यांमधून भराड या ठिकाणी प्रकट झाली. तांदळाचे वडे हे कोकणातलं पारंपरिक पदार्थ आहे. म्हणूनच देवीच्या उत्सवाला प्रसाद म्हणून तांदळाचे वडे दिले जातात. नवसाला पावणारी देवी असल्याने कोकणासह, महाराष्ट्र, कर्नाटक आणि देशातल्या इतर भागातूनही भाविक उपस्थित राहतात. आंगणेवाडीचा हा उत्सव केवळ दीड दिवस असतो मात्र लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
Ans: आंगणेवाडीची भराडी देवी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावातील भराड या परिसरात आहे. हे कोकणातील एक जागृत देवस्थान मानले जाते.
Ans: भराडी देवीच्या जत्रेचा इतिहास सुमारे ४०० वर्षांचा असल्याचे मानले जाते. त्यामुळे ही जत्रा कोकणातील अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे.
Ans: भराडी देवीच्या उत्सवासाठी देवीला कौल लावला जातो. देवीकडून कौल मिळाल्यानंतरच जत्रेची तारीख निश्चित केली जाते. त्यामुळे दरवर्षी जत्रेची तारीख वेगळी असते.






