भारतीय स्त्रिया आणि दागिने यांचं एक वेगळंच समीकरण आहे. फक्त सौंदर्यच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील दागिने स्त्रियांनी परिधान करणं फायदेशीर आहे असं आयुर्वेद देखील सांगतं. सोन्या चांदीचे अलंकर फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषही परिधान करतात. मात्र असं असलं तरी मंगळसूत्र आणि जोडवी घालण्याची बंधनं फक्त स्त्रियांनाच आहे ती पुरुषांना नाही असं का ते जाणून घेऊयात…
लग्नानंतर जोडवी आणि मंगळसूत्र घालण्याची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. या परंपरेमागे देखील एक विचार आहे. याबाबत किस्सों की दुनिया या इन्स्टापेजवरुन ओमकार सावंत यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. पुर्वीच्या काळापासून ते आता पर्यंत कष्टाची कामं ही गडी माणसं करत आलेली आहेत. शेती, लोहार, सुतार अशी विविध स्वरुपाची कामं पुरुष करत असे. कधी मातीमध्ये तर कधी उन वारा पावसात ही कामं काही सुटायची नाहीत. अशावेळी किंमती अलंकार शरीरावर परिधान करणं म्हणजे मोठी जोखीम असायची किंवा त्यास इजा पोहण्याची शक्यता असत. तसंच चोरी करणाऱ्या टोळीची देखील भिती असे. रानवाटांमधून जाताना किंमती अलंकरांची चोरी होणं या शक्यता जास्त असायच्या. त्यामुळे पुरुषांना फारसे अलंकार घालण्याची मुभा नसायची. त्यामुळे स्त्रियांना जशी या दागिन्यांची बंधनं आहेत तशी पुरुषांना नसतात. मात्र असं असलं तरी, पुरुषांना जबाबदारीची बंधनं आहेत.
आई, वडिल, मुले, भाऊ आणि पत्नी यांच्या पाठीशी उभं राहणं हे पुरुषांंचं पहिलं कर्तव्य मानलं जातं. संकटात असताना त्यांना धीर देणे त्यांची काळजी घेणे संकटात लढण्याचं बळ देणं कोणत्याही परिस्थिती कुटुंबाच्य़ा बरोबर ढालीसारखं उभं राहणं यासाठी पुरुष कायम असतो,अशी समाजाने पुरुषाची ओळख सांगितलेली आहे. त्यामुळे दागिन्यांच्या बाबतीत किंवा शारीरिक अशी अनेक बंधनं पुरुषांना नसली तरी मानसितक जबाबदाऱ्या पुरुषांना कायम असतात. फक्त याचं भान ठेऊन ही जाबाबदारी आणि बंधनं पुरुषांनी पाळायच्य़ा असतात. आता काळ बदलला आहे, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करत आहेत. त्यामुळे पुर्वापार चालत आलेल्या या अलंकारांची बंधनं आता शिथिल झालेली आहे. मात्र पुर्वापार चालत आलेल्या परंपरांमागे देखील अंधश्रद्धा नसून एक विचार होता.