फोटो सौजन्य- सोशल मीडिया
15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरात लोकशाहीच्या मूल्यांचे महत्त्व पटवून देणे आणि लोकशाहीची सक्षमता वाढवणे आहे. लोकशाही ही एक शासनप्रणाली आहे, जिथे लोकांना आपले नेते निवडण्याचा आणि स्वतःचे भविष्य ठरवण्याचा अधिकार असतो. या प्रणालीत पारदर्शकता, समता, आणि मानवी हक्कांना अग्रक्रम दिला जातो. लोकशाही दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे, तसेच शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची प्रेरणा देणे हा आहे. हा दिवस आपल्याला लोकशाहीच्या मुळांत असलेल्या मूल्यांची आठवण करून देतो आणि ती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याची गरज आहे, यावर भर देतो.






