फोटो सौजन्य- सोशल मीडिया
August 13 History : ‘प्रल्हाद केशव अत्रे’ (आचार्य अत्रे) हे मराठी साहित्य, पत्रकारिता, नाटक, चित्रपट आणि राजकारण या क्षेत्रांतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म आज म्हणजेच १३ ऑगस्ट १८९८ रोजी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे झाला. त्यांनी आपल्या प्रभावी लेखणीने आणि अमोघ वक्तृत्वाने मराठी जनतेच्या मनावर राज केला. ‘श्यामची आई’ या त्यांच्या चित्रपटाला भारताचा पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (सुवर्ण कमळ) मिळाला होता. त्यांनी ‘मराठा’ वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेला एक नवी दिशा दिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले. १३ जून १९६९ रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य आजही अजरामर आहे.





