अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी आणि मतविभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महायुतीत असले, तरी निवडणुकीच्या रिंगणात वेगवेगळे उमेदवार असल्याने महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
यावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी खासदार अनिल बोंडे हे पक्षाचे निष्ठावान असून, ते महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, १६ तारखेला होणाऱ्या बैठकीत परिस्थिती स्पष्ट होईल. उमेदवारी मागे घेणे काही वेळा अडचणीचे असू शकते; मात्र उमेदवारी कायम ठेवल्यानंतरही पाठिंबा मिळवून निवडणूक अधिक मजबूत करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी रोखण्यात नेते कितपत यशस्वी होतात आणि मतविभाजन टाळण्यासाठी कोणती रणनीती आखली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.