Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास

Titanic ship Accident : 14 एप्रिल 1912 च्या त्या काळोख्या रात्री, उत्तर अटलांटिक महासागरात हिमनगाशी टायटॅनिकची झालेली धडक क्षणात सर्व काही बदलून गेली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2026 | 10:35 AM
Luxury Titanic Ship accident Collision with an Iceberg April 15th History

Luxury Titanic Ship accident Collision with an Iceberg April 15th History

Follow Us
Follow Us:

जगाला हादरवून सोडणारी टायटॅनिक बुडण्याची दुर्घटना ही आजही अंगावर काटा आणते. ‘कधीही न बुडणारे जहाज’ म्हणून गौरवले गेलेले आरएमएस टायटॅनिक हे मानवी कौशल्याचे प्रतीक मानले जात होते. भव्यता, ऐश्वर्य आणि आधुनिक सुविधांनी सजलेले हे जहाज स्वप्नांच्या प्रवासाला निघाले होते.

मात्र 14 एप्रिल 1912 च्या त्या काळोख्या रात्री, उत्तर अटलांटिक महासागरात हिमनगाशी झालेली धडक क्षणात सर्व काही बदलून गेली. आनंदाने भरलेला प्रवास भय आणि आक्रोशात परिवर्तित झाला. अपुऱ्या लाइफबोट्समुळे अनेकांना मृत्यूच्या कुशीत जावे लागले, तर काहीजण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या प्रियजनांचा हात सोडायला तयार नव्हते. या दुर्घटनेने केवळ हजारो जीव घेतले नाहीत, तर अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. आरएमएस टायटॅनिक आजही समुद्राच्या तळाशी शांत पडलेले असले, तरी त्या रात्रीच्या किंकाळ्या आणि अश्रू इतिहासाच्या पानांत कायम घुमत आहेत. (Dinvishesh)

 

15 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1673 : मराठा साम्राज्याचे सरदार प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.
  • 1892 : जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
  • 1912 : आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
  • 1923 : मधुमेह असलेल्या लोकांसाठी इन्सुलिन सामान्यतः वापरण्यासाठी उपलब्ध झाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्विक शहरावर हल्ला केला.
  • 1955 : डेस प्लेन्स, इलिनॉय येथे पहिले मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट उघडले.
  • 1994 : भारताची दर आणि व्यापारावरील सामान्य करार ( GATT ) प्रस्तावावर स्वाक्षरी झाली.
हे देखील वाचा : महिलांचा आवाज होणार बुलंद; संसदेतील संख्या वाढल्याने बदलणार राजकारणाचे चित्र

15 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1452 : ‘लिओनार्डो डा विंची’ – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1519)
  • 1469 : ‘गुरू नानक देव’ – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1539)
  • 1707 : ‘लिओनार्ड ऑयलर’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 18 सप्टेंबर 1783)
  • 1741 : चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: 22 फेब्रुवारी 1827)
  • 1893 : नरहर रघुनाथ तथा ‘न. र. फाटक’ – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 21 डिसेंबर 1979)
  • 1894 : ‘निकिता क्रूश्चेव्ह’ – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1971)
  • 1901 : ‘अजय मुखर्जी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1912 : ‘मल्हार सदाशिव’ तथा ‘बाबूराव पारखे’ – उद्योजक व वेदाभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 1997)
  • 1912 : ‘किम सुंग’ (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 8 जुलै 1994)
  • 1922 : ‘हसरत जयपुरी’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 17 सप्टेंबर 1999)
  • 1932 : ‘सुरेश भट’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 2003)
  • 1963 : ‘मनोज प्रभाकर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
हे देखील वाचा :  जगभरातील कलाकारांना सलाम! का साजरा केला जातो ‘जागतिक कला दिन’? जाणून घ्या दा विंची यांच्याशी असलेले खास नाते

15 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1794 : ‘मोरेश्वर रामचंद्र पराडकर’ उर्फ मोरोपंत – पंडीतकवी यांचे निधन.
  • 1864 : ‘अब्राहम लिंकन’ – अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: 12 फेब्रुवारी 1809)
  • 1912 : ‘कप्तान एडवर्ड जे. स्मिथ’ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान यांचे निधन. (जन्म: 27 जानेवारी 1850)
  • 1980 : ‘जेआँ-पॉल सार्त्र’ – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म: 21 जून 1905)
  • 1990 : ‘ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन’ ऊर्फ ‘ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1905)
  • 1995 : ‘पंडित लीलाधर जोशी’ – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन.
  • 1998 : ‘पॉल पॉट’ – कंबोडियातील 20 लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता यांचे निधन. (जन्म: 19 मे 1925)
  • 2013 : ‘वि. रा. करंदीकर’ – संत साहित्याचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1919)

Web Title: Luxury titanic ship accident collision with an iceberg april 15th history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Titanic Ship

संबंधित बातम्या

Bharat Gayan Samaj Pune: आज भारत गायन समाजाची स्थापना झाली; जाणून घ्या १ सप्टेंबरचा इतिहास..
1

Bharat Gayan Samaj Pune: आज भारत गायन समाजाची स्थापना झाली; जाणून घ्या १ सप्टेंबरचा इतिहास..

Pranab Mukherjee death anniversary: आज प्रणब मुखर्जी यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ३१ ऑगस्टचा इतिहास..
2

Pranab Mukherjee death anniversary: आज प्रणब मुखर्जी यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ३१ ऑगस्टचा इतिहास..

August 30 History : आज वॉरन बफे यांचा वाढदिवस; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास…
3

August 30 History : आज वॉरन बफे यांचा वाढदिवस; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास…

National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..
4

National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.