Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास

डॉ. राधाकृष्णन यांनी भारतीय तत्त्वज्ञानाची पताका जागतिक स्तरावर फडकवली. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि नैतिकतेची जाणीव निर्माण केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 17, 2026 | 10:29 AM
Educationist Dr. Sarvepalli Radhakrishnan: Death Anniversary April 17 History

Educationist Dr. Sarvepalli Radhakrishnan: Death Anniversary April 17 History

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या दिवशी 1975 साली भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या निधनाने देशाने एक थोर विद्वान गमावला. त्यांच्या जाण्याने शिक्षणविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. साधेपणा, विद्वत्ता आणि उच्च नैतिक मूल्यांचा आदर्श त्यांनी आयुष्यभर जपला. डॉ. राधाकृष्णन यांनी भारतीय तत्त्वज्ञानाची पताका जागतिक स्तरावर फडकवली. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि नैतिकतेची जाणीव निर्माण केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो, हीच त्यांच्या योगदानाची पावती आहे. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी देशाला स्थैर्य आणि बौद्धिक नेतृत्व दिले. त्यांच्या भाषणांमधून नेहमीच मानवता, सहिष्णुता आणि ज्ञानाचा संदेश मिळत असे. (Dinvishesh)

 

17 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1941 : दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1946 : सीरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1950 : बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
  • 1952 : पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
  • 1970 : अपोलो प्रोग्राम: खराब झालेले अपोलो 13 अंतराळयान सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
  • 1971 : द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
  • 1975: ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह ताब्यात घेतली
  • 1983: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने उपग्रह प्रक्षेपण वाहन (रॉकेट) ‘SLV3’ प्रक्षेपित केले.
  • 2001 : अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • 2014 : नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपने दुसऱ्या ताऱ्याच्या राहण्यायोग्य क्षेत्रामध्ये पृथ्वीच्या आकाराचा पहिला ग्रह शोधल्याची पुष्टी केली.
हे देखील वाचा : भाजपचा राजकीय डाव यशस्वी! बिहारमध्ये सत्ता मिळवण्यास अखेर मिळाले यश

17 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1478 : ‘आचार्य संत सूरदास’ – हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे यांचा जन्म.
  • 1820 : ‘अलेक्झांडर कार्टराईट’ – बेसबॉल चे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 जुलै 1892)
  • 1837 : ‘जे. पी. मॉर्गन’ – अमेरिकन सावकार यांचा जन्म. (मृत्यू: 31 मार्च 1913)
  • 1891 : कोशकार यशवंत रामकृष्ण दाते – यांचा जन्म. (मृत्यू: 21 मार्च 1973)
  • 1897 : ‘निसर्गदत्त महाराज’ – अद्वैत तत्त्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 1981)
  • 1916 : ‘सिरिमाओ बंदरनायके’ – जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या 6 व्या पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2000)
  • 1951 : ‘बिंदू’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1961 : ‘गीत सेठी’ – बिलियर्डसपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘मुथय्या मुरलीधरन’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1977 : ‘दिनेश मोंगिया’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
हे देखील वाचा : अमेरिका-इराणमधील चर्चा ठरल्या निष्फळ, तणाव वाढला; होर्मुझ नाकेबंदीचा सर्वांना बसणार फटका

17 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1790 : ‘बेंजामिन फ्रँकलिन’ – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1706)
  • 1882 : ‘जॉर्ज जेनिंग्स’ – फ्लश टॉयलेट चे शोधक यांचे निधन. (जन्म: 10 नोव्हेंबर 1810)
  • 1946 : ‘व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री’ – भारत सेवक समाजाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 22 सप्टेंबर 1869)
  • 1975 : ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ – भारताचे दुसरे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1888)
  • 1997 : ‘बिजू पटनायक’ – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री यांचे निधन.
  • 1998 : ‘विजय सिप्पी’ – चित्रपट निर्माते यांचा मृत्यू.
  • 2001 : ‘डॉ. वा. द. वर्तक’ – वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 19 ऑक्टोबर 1925)
  • 2004 : ‘सौंदर्या’ – कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1972)
  • 2011 : ‘वि.आ. बुवा’ – विनोदी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 4 जुलै 1926)
  • 2012 : ‘नित्यानंद महापात्रा’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 17 जुन 1912)

Web Title: Educationist dr sarvepalli radhakrishnan death anniversary april 17 history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास
1

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास
2

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास
3

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास

वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम भव्य लाल किल्ल्याचे उभारणी; जाणून घ्या 13 एप्रिलचा इतिहास
4

वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम भव्य लाल किल्ल्याचे उभारणी; जाणून घ्या 13 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.