Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा कानमंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र भारताच्या सक्षम आणि समान अधिकार असलेल्या समाज निर्मितीमध्ये मोठा वाटा आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 10:36 AM
Architect of the Indian Constitution Dr. Babasaheb Ambedkar Jayanti April 14th History

Architect of the Indian Constitution Dr. Babasaheb Ambedkar Jayanti April 14th History

Follow Us
Follow Us:

Dr. Babasaheb Ambedkar jayanti :  भारतीय लोकशाहीच्या पायाभरणीतील तेजस्वी शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती. त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करत आहे. अन्याय, अस्पृश्यता आणि विषमतेच्या अंधःकारातून समाजाला प्रकाशाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला.

स्वातंत्र्यानंतर राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांची चौकट नसून, ती समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची पवित्र शपथ आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी ही राज्यघटना त्यांच्या दूरदृष्टीची जिवंत साक्ष ठरते. दलित, शोषित आणि वंचितांच्या अश्रूंना शब्द देत, त्यांच्या हक्कांसाठी लढताना त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र दिला. शिक्षण, कामगार हक्क आणि स्त्रीसमानतेसाठी त्यांनी केलेले कार्य समाज परिवर्तनाचे दीपस्तंभ ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. (Dinvishesh)

 

14 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1661 : प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने दुर्बिणीसाठी टेलिस्कोप हा शब्द प्रथम वापरला.
  • 1665 : पुरंदरच्या प्रसिद्ध वेढादरम्यान दिलरखान पठाणने वज्रमल किल्ला ताब्यात घेतला.
  • 1736 : चिमाजीअप्पाने जंजिऱ्याच्या सिद्धीसाताचा पराभव केला.
  • 1865 : जॉन विल्क्स बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. दुसऱ्या दिवशी लिंकनचा मृत्यू झाला.
  • 1912 : आर.एम.एस. टायटॅनिक रात्री 11:40 वाजता (स्थानिक वेळेनुसार) उत्तर अटलांटिक महासागरातील एका हिमखंडाला धडकले.
  • 1944 : दुपारी 4:50 वाजता, बॉम्बे डॉक्सवर फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर मोठा स्फोट झाला, 300 लोक ठार झाले आणि सुमारे 2 कोटी पौंडचे आर्थिक नुकसान झाले.
  • 1995 : टेबल टेनिसमधे सलग 6670 रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
हे देखील वाचा : एका सूरमयी प्रवासाचा अंत…! जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हटके स्वरांनी गाजवले बॉलीवूड\

14 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1629 : ‘क्रिस्टियन हायगेन्स’ – डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध यांचा जन्म. (मृत्यू: 8 जुलै 1695)
  • 1891 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: 6 डिसेंबर 1956)
  • 1914 : ‘शांता हुबळीकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1992)
  • 1919 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 2013)
  • 1919 : ‘के. सरस्वती अम्मा’ – भारतीय लेखक आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1975)
  • 1922 : मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: 18 जून 2009)
  • 1927 : ‘द. मा. मिरासदार’ – विनोदी लेखक यांचा जन्म.
  • 1942 : ‘मार्गारेट अल्वा’ – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल यांचा जन्म.
    1943 : ‘रामदास फुटाणे’ – वात्रटिकाकार यांचा जन्म.
हे देखील वाचा : वर्गाबाहेरच्या शिक्षणापासून संविधान निर्मितीपर्यंत, बाबासाहेबांना समजून घायचंय? ‘ही’ 3 पुस्तकं नक्की वाचा 

14 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1950 : योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर – भारतीय तत्त्ववेत्ते समाधिस्थ झाले. (जन्म: 30 डिसेंबर 1879)
  • 1962 : भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: 15 सप्टेंबर 1860)
  • 1963 : केदारनाथ पांडे तथा ‘राहूल सांकृतायन’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1893)
  • 1997 : ‘चंदू पारखी’ – चित्रपट आणि नाट्य अभिनेते यांचे निधन.
  • 2013 : ‘राम प्रसाद गोएंका’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 1 मार्च 1930)

Web Title: Architect of the indian constitution dr babasaheb ambedkar jayanti april 14th history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Pranab Mukherjee death anniversary: आज प्रणब मुखर्जी यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ३१ ऑगस्टचा इतिहास..
1

Pranab Mukherjee death anniversary: आज प्रणब मुखर्जी यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ३१ ऑगस्टचा इतिहास..

August 30 History : आज वॉरन बफे यांचा वाढदिवस; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास…
2

August 30 History : आज वॉरन बफे यांचा वाढदिवस; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास…

National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..
3

National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..

August 27 History: आज दोराबजी टाटा यांची जयंती; जाणून घ्या २७ ऑगस्टचा इतिहास..
4

August 27 History: आज दोराबजी टाटा यांची जयंती; जाणून घ्या २७ ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.