
Dinvishesh
आज मराठा साम्राज्याचे थोरले पेशवा, श्रीमंत बाजीराव बल्लाळ भट्ट यांची पुण्यतिथी आहे. बाजीरावांनी अल्पवयातच पदाभार स्वीकरला होता. त्यांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी अनेक युद्धे लढली. त्यांच्या धाडसामुळे आणि उत्तम रणनीतीमुळे भारताताही मराठ्यांचा प्रभाव वाढत गेला. शत्रूचा सतत पाठलाग करत रहा या युद्धनितीने आणि त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा साम्राज्याला मोठी उंची मिळाली आहे. २८ एप्रिल १७४० रोजी रावेरखेडी येथे त्यांचे निधन झाले.
28 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1916 : होम रुल लीगची स्थापना झाली.
1920: अझरबैजान सोव्हिएत युनियनमध्ये सामील झाला.
1969 : चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
2001 : डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
2003 : ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
2007 : 2007 साली श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला.
2008 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ‘PSLV-C9’ उपग्रह प्रक्षेपित केला.
28 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
1758 : ‘जेम्स मोन्रो’ – अमेरिकेचे 5 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1831)
1854 : ‘वासुकाका जोशी’ – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 1944)
1908 : ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.
1916 : प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 1993)
1931 : लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.
1937 : इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 2006)
1942 : इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.
1968 : झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.
28 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष
1740 : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1700)
1903 : ‘जोशिया विलार्ड गिब्स’ – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
1945 : इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: 29 जुलै 1883)
1978 : अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1909)
1992 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1909)
1998 : ‘रमाकांत देसाई’ – जलदगती गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 20 जून 1939)
हे देखील वाचा : मोफत पैशांच्या योजनांनी मोडले राज्याचे कंबरडे; हिमाचल प्रदेश सरकारवर ओढावली नामुष्की