
Dinvishesh
आज महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा हा दिवस Water Condervation Day म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीस करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन विभागाची निर्मिती केली होती. त्यांच्या या कार्याचा आदर म्हणून त्यांना जलनायक म्हटले जाते. सुधाकरराव यांनी १९९१ ते १९९३ च्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले होते.
10 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1818 : रायगड किल्ला इंग्रज आणि मराठ्यांमध्ये तह झाला आणि इंग्रजांच्या ताब्यात गेला.
1824 : लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली.
1857 : भारताचे पहिले स्वतंत्रता संग्राम झाले.
1877 : रोमेनियाने स्वतःला तुर्कस्तानपासून स्वतंत्र जाहीर केले.
1907 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
1937 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
1940 : दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जियम आणि फ्रान्सवर हल्ला केला.
1940 : दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिला आणि विन्स्टन चर्चिल युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाले.
1962 : मार्वल कॉमिक्सने द इनक्रेडिबल हल्कचा पहिला अंक प्रकाशित केला.
1979 : मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
1981 : भारतात प्रथमच मुंबईत रात्रीचा क्रिकेट सामना खेळवण्यात आला.
1981 : फ्रँकोइस मिटरँड फ्रान्सचे अध्यक्ष झाले.
1993 : संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
1994 : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रप्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्रे हाती घेतली.
1997 : इराणमध्ये 7.3 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपात सुमारे 1,567 लोकांचा मृत्यू झाला, 2,300 लोक जखमी झाले आणि 50,000 लोक बेघर झाले.
2002 : घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना चेंगराचेंगरी, 120 ठार.
2013 : वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच इमारत (त्या काळातील) बनली.
10 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1265 : ‘फुशिमी’ – जपानचा सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 8 ऑक्टोबर 1317)
1855 : ‘युकतेश्वर गिरी’ – भारतीय गुरु आणि शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1936)
1889 : ‘नारायण दामोदर सावरकर’ – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार यांचा जन्म.
1905 : ‘पंकज मलिक’ – गायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1978)
1909 : ‘बेल्लारी शामण्णा केशवन’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 2000)
1914 : ‘ताराचंद बडजात्या’ – चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 21 सप्टेंबर 1992)
1918 : ‘रामेश्वरनाथ काओ’ – रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 2002)
1927 : ‘नयनतारा सहगल’ – भारतीय लेखिका यांचा जन्म.
1931 : ‘जगदीश खेबूडकर’ – ज्येष्ठ गीतकार यांचा जन्म.
1940 : ‘माणिकराव गोडघाटे’ ऊर्फ ग्रेस – प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी यांचा जन्म. (मृत्यू: 26 मार्च 2012)
1986 : ‘पेंड्याला हरिकृष्ण’ – बुद्धीबळपटू यांचा जन्म.
10 मे रोजी मृत्यू दिनविशेष
1774 : ‘लुई (पंधरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 15 फेब्रुवारी 1710)
1899 : ‘महादेव विनायक रानडे’ – रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल यांना फाशी.
1981 : विमादि तथा ‘विनायक माधव दीक्षित’ – विनोदी लेखक प्राध्यापक पटवर्धन यांचे निधन.
1998 : ‘यदुनाथ दत्तात्रय थत्ते’ – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 5 ऑक्टोबर 1922)
2000 : ‘नागोराव घन:श्याम’ तथा ‘ना. घ. देशपांडे’ – कवी यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1909)
2001 : ‘सुधाकरराव नाईक’ – महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1934)
2002 : सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ‘कैफी आझमी’ – गीतकार यांचे निधन. (जन्म: 14 जानेवारी 1919)
2015 : ‘निनाद बेडेकर’ – भारतीय इतिहासकार, लेखक यांचे निधन. (जन्म: 17 ऑगस्ट 1949)
महाराष्ट्र टू ओमान! ‘धवल लक्ष्मी’ची 3,500 किलोमीटरची अनोखी जल सफर, वाचा सविस्तर…