Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : मराठी रंगभूमीचे वैभव ‘बालगंधर्व’ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १५ जुलैचा इतिहास

Dinvishesh: बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस यांचा आज स्मृतिदिन आहे. बालगंधर्व यांनी मराठी रंगभूमीला नवे वैभव मिळवून दिले. आपल्या सुरेल गायन, प्रभावी अभिनय आणि संगीत नाटकांनी, स्त्री भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. शाकुंतल नाटकात त्यांनी साकारलेल्या शकुंतलेच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 08:38 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णअध्याय म्हटले की आठवतात ते म्हणजे बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस यांचा आज स्मृतिदिन आहे. ज्यांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि स्त्री भूमिकांतील अप्रतिम अभिनयाने प्रक्षेकांच्या मनावर राज्य केले. त्या काळी महिलांना रंगभूमीवर अभिनय सादर करण्यास मान्यता नव्हती. त्यावेळी बालगंधर्वंनीच स्त्री भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिका आजही अभिनयाचा आदर्श मानल्या जातात. संगीत मानपान, सौभद्र यांसारख्या नाटकांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचे नाटक पाहिल्यानंतर त्यांना बालगंधर्व ही पदवी बाळ गंगाधर टिळक यांनी बहाल केली आणि यानंतर त्यांना याच नावाने संबोधले जाऊ लागले. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.  १५ जुलै १९५७ रोजी त्यांचे निधन झाले. पण मराठी रंगभूमीवरील त्यांचे योगदान आजही अजरामर आहे.

15 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1662 : इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची स्थापना झाली.
  • 1674 : मुघल सरदार बहादूरशाह कोकलताश यांच्या नेतृत्वाखाली पेडगावची लूट रायगडावर जमा करण्यात आली.
  • 1926 : कुलाबा ते मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरीय बससेवा सुरू झाली.
  • 1927 : र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1955 : 58 नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ घोषणेवर स्वाक्षरी केली.
  • 1955 : पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • 1961 : स्पेनने स्त्री-पुरुषांसाठी समान हक्क स्वीकारले.
  • 1962 : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी संस्था सुरू झाली.
  • 1996 : पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 1997 : पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2006 : ट्विटर हा प्लॅटफॉर्म सुरु झाला.
  • 2011 : भारताने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV द्वारे आधुनिक संचार उपग्रह GSAT-12 अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
  • 2014 : जागतिक युवा कौशल्य दिन
Dinvishesh : थोर समाजसुधारक आणि ‘केसरी’चे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती; जाणून घ्या १४ जुलैचा इतिहास

15 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1606 : ‘रेंब्राँ’ – डच चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1669)
  • 1611 : ‘मिर्झाराजे जयसिंग’ – जयपूर चे राजे यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑगस्ट 1667)
  • 1903 : ‘के. कामराज’ – खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1975)
  • 1904 : ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर’ – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 फेब्रुवारी 2001)
  • 1905 : ‘चौधरी मुहंमद अली’ – पाकिस्तानचे 4थे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1980)
  • 1906 : ‘राम श्री मुगली’ – कन्नड भाषेतील लेखक यांचा जन्म.
  • 1917 : ‘नूरमोहंमद तराकी’ – अफगणिस्तानचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 14 सप्टेंबर 1979)
  • 1927 : ‘प्रा. शिवाजीराव भोसले’ – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 2010)
  • 1932 : ‘नरहर कुरुंदकर’ – भारतीय लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 10 फेब्रुवारी 1982)
  • 1933 : ‘एम. टी. वासुदेवन’ – नायर भारतीय लेखक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1937 : ‘श्री प्रभाज जोशी’ – भारतीय पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 2009)
  • 1949 : ‘माधव कोंडविलकर’ – दलित साहित्यिक यांचा जन्म.
15 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1291 : ‘रुडॉल्फ (पहिला)’ – जर्मनीचा राजा यांचे निधन. (जन्म : 1 मे 1218)
  • 1542 : ‘डेल जिकॉन्डो’ – लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा यांचे निधन. (जन्म : 15 जून 1479)
  • 1904 : ‘अंतॉन चेकॉव्ह’ – रशियन कथाकार व नाटककार यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1860)
  • 1919 : ‘हर्मान एमिल फिशर’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 9 ऑक्टोबर 1852)
  • 1953 : ‘भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस’ – ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक यांचे
  • निधन. (जन्म : 21 सप्टेंबर 1882)
  • 1967 : ‘नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व’ – गायक व नट यांचे निधन. (जन्म : 26 जून 1888)
  • 1979 : ‘गुस्तावोदियाझ ओर्दाझ’ – मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1991 : ‘जगन्नाथराव जोशी’ – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते यांचे निधन.
  • 1998 : ‘ताराचंद परमार’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 1999 : ‘जगदीश गोडबोले’ – पर्यावरणवादी लेखक यांचे निधन.
  • 1999 : ‘इंदुताई टिळक’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.
  • 2004 : ‘डॉ. बानू कोयाजी’ – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक यांचे निधन. (जन्म : 22 ऑगस्ट 1918)
Dinvishesh : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता निळभाऊ फुले यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १३ जुलैचा इतिहास

Web Title: Dinvishesh 15 july narayan shripad rajhans balgandharva death anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
3

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
4

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.