Dinvishesh : थोर समाजसुधारक आणि 'केसरी'चे पहिले संपादत गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती; जाणून घ्या १४ जुलैचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : आज थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ,. विचारवंत आणि पत्रकार गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती आहे. १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्याच्या टेंभू सध्याचे कराड येथ त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजकि जनजागृती निर्माण करण्यासाछी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी लोकमान्य बाल गंगाधर टिळख यांच्या केसरी या वृत्तपत्राचे ते पहिले संपादक होते. यानंतर त्यांनी १८८८ मध्ये सुधारक या वृत्तपत्राची सुरुवात केली. यामधून त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकतेच्या मूल्यांचा प्रचार केला. सामाजिक समता, स्री-पुरुष समानता आणि अंधश्रद्धेविरोधी विचारांचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे.
14 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
14 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






