फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Dinvishesh 2 September: विष्णू सखाराम खांडेकर यांचा आज स्मृतीदिन आहे. ते एक मराठी साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिभावान आणि लोकप्रिय लेखक, कादंबरीकार व निबंधकार होते. त्यांच्या ‘ययाती’ या महाकादंबरीला १९७४ चा प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असून, हा बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्यात मानवी मूल्ये, जिव्हाळा, समाजसुधारणा आणि उच्च नैतिक विचारांचा संदेश प्रकर्षाने दिसून येतो. ‘उल्का’, ‘दोन ध्रुव’, ‘क्रौंचवध’ आणि ‘अमृतवेल’ यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्या मराठी वाचकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत.






