फोटो सौजन्य- सोशल मिडिया
Umaji Naik Jayanti : आज आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती आहे. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे उमाजी नाईक हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील एक अग्रणी योद्धे होते.त्यांनी पुण्याच्या रामकिल्ल्यावर आणि पुरंदर परिसरात ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा उभारून त्यांच्या छावण्यांवर हल्ले चढवले होते.शेतकऱ्यांवर आणि सामान्यांवर अन्याय करणाऱ्या सावकार अन् वतनदारांना वेसण घालण्याचे काम त्यांनी आपल्या बंडखोरीच्या माध्यमातून केले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष पुकारला आणि जनतेच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटवली. महाराष्ट्रातील या महान स्वातंत्र्यसैनिकाचे बलिदान आणि त्यांचे क्रांतिकारी विचार आजही तरुण पिढीला देशसेवेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देतात.






