Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरा-भाईंदरमध्ये पुतळ्यावरून रणकंदन! “व्यापारी स्वार्थासाठी शिवरायांचा पुतळा हटवण्याचा डाव”; प्रताप सरनाईकांचा भाजपवर घणाघात

मिरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून राजकारण तापले आहे. मॉल उभारण्यासाठी हा डाव रचल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 10, 2026 | 09:18 PM
Pratap Sarnaik (Photo Credit- X)

Pratap Sarnaik (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मिरा-भाईंदरमध्ये पुतळ्यावरून रणकंदन!
  • “व्यापारी स्वार्थासाठी शिवरायांचा पुतळा हटवण्याचा डाव”
  • प्रताप सरनाईकांचा भाजपवर घणाघात
मिरा भाईंदर: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुरुस्ती आणि स्थलांतराच्या नावाखाली हटवण्याचा सुरू असलेला प्रयत्न हा केवळ एका पुतळ्याचा प्रश्न नसून मीरा-भाईंदर शहरातील मराठी माणसांच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रत्रकार परिषदेत केला आहे. सरनाईक म्हणाले की, शहरातील मराठी समाजाच्या भावना आणि इतिहास पायदळी तुडवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या मध्यभागी अभिमानाने उभा आहे. मात्र काही लोकांच्या व्यापारी आणि राजकीय स्वार्थासाठी तो हटवण्याचा डाव रचला जात आहे. भाजपा आमदारा नरेंद्र मेहता यांनी पुतळा हटवण्यात येणार नाही असं सांगितलं असलं तरी आपला त्यावर भरवसा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी सांगितले की, सन २०१७-१८ मध्ये भाजपची सत्ता असताना महानगरपालिकेच्या जागेवर अत्याधुनिक मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्या प्रस्तावातील सर्वात मोठा “अडथळा” म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. “त्या काळात पुतळा शहराच्या मध्यभागातून हटवून गावाबाहेरील चौकात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, जेणेकरून पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना महानगरपालिकेच्या भूखंडावर मोठे मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारता येतील. हे कोणासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी केले जात होते, हे संपूर्ण शहराला माहिती आहे,” असे सरनाईक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, महासभेत मांडण्यात आलेला घोषवारा आणि ठराव वेगळा होता. तसेच आमदार नरेंद्र मेहता हे “पुतळ्याची दुरुस्ती करून तो पुन्हा त्याच ठिकाणी बसवला जाईल” असे सांगत असले तरी ते साफ खोटे असल्याचा सांगत, मेहतावर माझा भरोसा नसल्याचं सांगितलं आहे.

सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा उल्लेख करत सांगितले की, दोन किलोमीटरच्या परिसरात राष्ट्रीय पुरुषांचे दुसरे स्मारक किंवा पुतळा उभारण्यास नियम आहेत. त्या काळात अनेक शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे तो प्रस्ताव थांबवण्यात आला आणि दुसरा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या हा पुतळा आता अनधिकृत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “योगायोगाने त्या वेळी महापालिकेत त्यांची सत्ता नव्हती आणि संबंधित आमदारही सत्तेत नव्हते, त्यामुळे हा डाव यशस्वी झाला नाही. दुसऱ्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले,” असेही त्यांनी नमूद केले.

व्यावसायिक वाहनचालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मात्र त्यानंतर पुन्हा सत्ता आल्यानंतर पहिल्याच महासभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा विषय आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या भूखंडावर मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे प्रस्तावही पुढे आणण्यात आले. “पुतळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला व्यापारी संकुले उभारून मध्यभागातील जागा मोकळी करण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे,” असे सरनाईक म्हणाले. या प्रकरणासंदर्भातील सर्व कागदपत्रे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, दोन किलोमीटर नियमाचा शासन निर्णय (जीआर) आणि २० वर्षांनंतर अचानक स्थलांतराचा निर्णय का घेतला जात आहे याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला. “जर हा विषय महासभेत घ्यायचाच होता, तर आधी राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक होते. परवानगी न घेता असा विषय पत्रिकेवर आणणे म्हणजे नियमांची पायमल्ली आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

एका बाजूला विकास आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचे गोड बोल सांगितले जात असताना दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरच घाव घालण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. “मीरा-भाईंदरच्या जनतेने ज्यांना भरभरून मते दिली, त्याच जनतेच्या आणि शिवप्रेमींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम आज सुरू आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, तर उद्या मराठी माणसांनाही या शहरातून हटवण्याचा प्रयत्न केला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. व्यापारी वृत्तीच्या माध्यमातून शहराची ओळख आणि अस्मिता विकण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी इशारा दिला की, “जोपर्यंत हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडू.” याचवेळी सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही. पुतळ्याच्या सुशोभीकरणाची जबाबदारी घेण्यासही मी तयार आहे.”

Pratap Sarnaik News: धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे; राज्यात ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ उभारणार: प्रताप सरनाईक यांची माहिती

Web Title: Mira bhayander shivaji maharaj statue controversy pratap sarnaik vs narendra mehta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • mira bhayandar
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
1

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब
2

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप
3

Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप

Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘मैदानबंदी’? नव्या भाडे धोरणावरून भाजप-शिवसेना आमनेसामने
4

Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘मैदानबंदी’? नव्या भाडे धोरणावरून भाजप-शिवसेना आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.